अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मराठा आरक्षण यावर आज न्यायालयाने निर्णय दिला. व हे आरक्षण रद्द केले आहे. याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहे.
यातच जिल्ह्यातील राहुरी येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करून करून तरुण रस्त्यावर उतरले.

यावेळी उपस्थित आंदोलनकर्ते म्हणाले कि, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला आहे.
सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडले आहे,त्यामुळेच मराठ्यांचे आरक्षण न्यायालयात टिकू शकलेले नाही.
या परिस्थितीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते आहे. आम्ही राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला सांगू इछितो की आपण समन्वयातून मराठा समजाच्या आरक्षणा विषयी मार्ग काढावा.
अन्यथा भविष्यकाळात वेळीच मराठा समाजाला योग्य न्याय न मिळाल्यास समजाचा उद्रेक होऊन सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असे आंदोलनकर्ते म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|