राहाता बाजार समितीत कांद्यासह फळांची आवक वाढली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोना संसर्गाची परिस्थिती भयंकर असतानाही केवळ शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून राहाता बाजार समितीचे मार्गदर्शक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचनेनुसार राहाता बाजार समितीमधील सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज चालू आहेत.

नुकतेच राहाता बाजार समितीत 12 हजार 28 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1400 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

तसेच कांदा नं. 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला.

बाजार समितीत डाळींबाची 1865 क्रेटस इतकी आवक झाली. काल एक नंबर डाळींबाला प्रतिकिलो 91 ते 120 रुपये, डाळींब नं. 2- 61 ते 90 रुपये, डाळींब नं. 3- 31 ते 60 रुपये,

डाळींब नं. 4- 2.50 ते 30 रुपये इतका भाव प्रतिकिलोला मिळाला. चिकूची 20 क्रेटस इतकी आवक झाली. चिकुला कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 1600 रुपये असा भाव मिळाला.

सरासरी 1600 रुपये भाव मिळाला. करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe