अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शेतात पिकवलेला माल विक्रीस अडचण येत असल्याने बळीराजा हतबल झाला होता.
मात्र करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे. यामुळे हि बाजार समिती शेतकऱ्यांसाठी हिताची ठरते असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राहाता बाजार समितीत कांद्यासह काही फळांची देखील मोठी आवक होत आहे. नुकतेच बाजार समितीमध्ये डाळिंबाची 2037 क्रेटस इतकी आवक झाली. एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो ला 91 ते 120 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंब नं. 2 ला प्रतिकिलोला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नं. 3 ला प्रतिकिलोला 31 ते 60 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नं. 4 ला 2.50 ते 30 रुपये इतका भाव प्रतिकिलोला मिळाला.
तर बाजार समितीत 12 हजार 302 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1500 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. कांदा नं.2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 300 ते 600 रुपये इतका भाव मिळाला.
गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला. चिकू ची 29 क्रेटस इतकी आवक झाली. चिकुला कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 1500 रुपये असा भाव मिळाला. सरासरी 1250 रुपये भाव मिळाला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|