कोपरगावच्या काळेंचा सवाल, फडणवीस यांनी ई-पास काढलाय का?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार ई-पाससाठी अर्ज केला आहे का ? याची माहिती मागितली आहे.

दहा माणसांपेक्षा जास्त गर्दी करायची नसतानाही गर्दी करण्यासाठी परवानगी होती का?, असा प्रश्न माहितीच्या अधिकारात कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे.

राज्यात लॉकडाउन असून कठोर निर्बंध लावण्यात आलेले असताना देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. फडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना संबंधीच्या नियमांचं उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा दौरा केला होता. कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठ आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उदघाटन करण्यासाठी ते पोहोचले होते.

दरम्यान निलेश राणे यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं.

तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे,” असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe