अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा लालपरीचे चाक थांबले आहे. यामुळे एरवी रस्त्यांवरून धावणारी बस केवळ डेपोतच उभी असलेली दिसून येत होती.
मात्र आता आजपासून जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक बस धावणार आहे. श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा आजपासून सुरु होत आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केले आहे. करोनाचा प्रसार होवू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषीत केला होता.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाजावर बंदी होती. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवासी जावून करोनाचा प्रसार होवू नये म्हणून प्रवासी बस वाहतूक बंद केली होती.
बससेवा बंद असल्याने नोकरीनिमित्त दुसर्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. याचा फायदा खाजगी वाहतूक करणार्या वाहनधारकांनी घेतला.
प्रवाशांची लुट सुरु झाली, श्रीरामपूर ते पुणे अडीचशे रुपये भाडे असताना वाहनधारक अडवणूक करुन तिप्पट आकाराणी करु लागले.
ज्यांना जाणे गरजेचे होते त्यांनी ते सहन केले. अखेर श्रीरामपूर बस डेपोने आजपासून श्रीरामपूर ते पुणे बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी दिली. श्रीरामपूर-पुणे ही बसा सुरु होणार असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन श्रीगोड यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम