अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- एक एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याच्या खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे.
रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने सदर एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून टाकली. सदर एटीएम मधून १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केली.
कोल्हार बुद्रुक येथे राहणारे विजय केशव थेटे यांच्या अखत्यारीत हे एटीएम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर थेटे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून एटीएम फोडीच्या घटनेचा संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने तपास सुरु केला.
याप्रकरणी विजय केशव थेटे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम