रोटरी क्लब इंटिग्रिटीच्या पदग्रहण सोहळ्यात झंवर यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- रोटरीच्या माध्यमातून सामन्य माणसाला असामान्य कामगिरी करण्याची संधी मिळते. रोटरीमध्ये सामाजिक कार्य करण्याची अमर्याद संधी आहेत. संकटाची मालिका न संपणारी आहे. येणारे संकट संधी देखील घेऊन येत असतात, तर कार्य करण्याचे बळ देखील देते.

युवकांच्या माध्यमातून बदल घडणार असून, युवकांचा क्लब असलेल्या रोटरी इंटिग्रिटीकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबचे पब्लिक इमेज समन्वयक डॉ. दिपक शिकरपूर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीचा पदग्रहण सोहळ्यात शिकरपूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी रोटरीचे सहा. पब्लिक इमेज समन्वयक प्रमोद पारिख, उपप्रांतपाल मनिष नय्यर, जिल्हा संचालक पब्लिक इमेज रणजीत शेवाळे, शिरीष रायते, नुतन अध्यक्ष सुयोग झंवर, संस्थापक अध्यक्ष जावेद शेख उपस्थित होते. पुढे शिकरपूर म्हणाले की, नेटवर्किंग तत्वावर चालणारी रोटरी ही संस्था आहे.

अनेक दिग्गज व्यक्तीमत्वांशी आपण जोडले जात असल्याचे त्यांनी सांगून रोटरीमध्ये देशासह परदेशातील अनेक नामवंत व्यक्ती रोटरीच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी सिद्धांत पटनाइक यानी गिटारवर गणेश वंदना सादर केली.

रोटरी इंटिग्रिटीचे संस्थापक जावेद शेख यांनी मागील तीन वर्षाचा सामाजिक कार्याचा आढावा घेऊन, क्लबच्या वतीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रोटरी इंटिग्रिटीचे संस्थापक जावेद शेख यांनी सुयोग झंवर यांना अध्यक्षपदाची सूत्रे बहाल केली.

तसेच सचिव हेमंत लोहगावकर यांना सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. नूतन अध्यक्ष सुयोग झंवर यांनी रोटरीच्या माध्यमातून पाचही क्लबने एकत्र येऊन कोविड सेंटर उभारुन गरजू रुग्णांची सेवा केली. निशुल्क पध्दतीने चालविण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमधून बाराशेपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले.

रोटरी इंटिग्रिटीने बुथ हॉस्पिटलला संकटकाळात ऑक्सिजनची मदत केली. तसेच अनेक गरजूंना मदत देण्याचे कार्य केले. याही वर्षी अनेक गरजूंना रोटरी इंटिग्रिटी आधार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रोटरीमध्ये इतरांना मदत करताना खर्‍या अर्थाने मनुष्याचा सर्वांगीन विकास घडत असल्याचे स्पष्ट केले.

रणजित शेवाळे यांनी पब्लिक इमेजवर फोकस करुन काम करण्याची संधी रोटरीच्या माध्यमातून मिळत असते. सर्वात जुनी व सर्वात मोठी जगभर सामाजिक काम करणारी संस्था म्हणून रोटरीची ओळख आहे. जात, धर्म, पंथ व वर्ण भेद विसरुन सर्व एकत्र येऊन मानवतावादी उपक्रम घेत असतात.

या भावनेने रोटरी इंटिग्रिटीत युवक एकत्र आले असून, या क्लबची समाजसेवेची अखंडता सुरु राहणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मनिष नय्यर यांनी कोरोनामुळे वंचितांना मदतीचा हात देऊन काम करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.

रोटरीच्या माध्यमातून नूतन पदाधिकार्‍यांच्या पाठिशी उभे राहून भरीव सामाजिक कार्य घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या पदग्रहण सोहळ्यात कोरोनाच्या संकटकाळात अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचवणारे डॉ. पियुष पाटील, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. नितीन नागरगोजे, डॉ. ठोकळ,

डॉ. जंगम, डॉ. मुकुंद तांदळे या डॉक्टरांना कोरोना योध्दा सन्मान देऊन गौरविण्यात आले. तसेच नगरचे भूषण असलेली गायिका अंजली गायकवाड हिचा क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीतिज झावरे यांनी केले. रज्जक सय्यद यांनी आभार मानले. यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष प्रशांत बोगावत,

सचिव पुरुषोत्तम जाधव, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष ईश्‍वर बोरा, आय.पी.पी. प्रसन्ना खाजगीवाले, रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे, मनीष बोरा, राजेश परदेशी, निखील कुलकर्णी, डॉ.आसाराम खाडे, दादा करंजुले, किरण गुंड, शुभश्री पटनाईक, पुनित वोहरा आदी रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe