अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. तालिबाने अफगणिस्थान ताब्यात घेतल्यावर भारताबरोबरची सर्व आयात आणि निर्यात बंद केली असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉ.अजय सहाय यांनी दिली.
सध्या तालिबानने पाकिस्तानच्या संक्रमण मार्गांद्वारे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. यामुळे सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. भारत अफगाणिस्तानमधून सुमारे ८५ टक्के सुका मेवा आयात करत आहे.
भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. तर अफगाणिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सुकामेव्याचा समावेश आहे.
भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या एकूण आयातीपैकी 85 टक्के हिस्सा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत FIEO चे संचालक अजय सहाय यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम