नाना पटोले म्हणाले भाजप भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली, भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत.

भाजपच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजप हा भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

तसेच भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांना एकत्र करत असल्याचे

त्यांनी सांगितले, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे. या दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजप आपली जबाबदारी झटकू पाहत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe