एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचा सन्मान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बलभीम कुबडे, खजिनदार विठ्ठल देवकर, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे नेते आनंदराव वायकर, अनंत लोखंडे आदिंसह केवटे कुटुंबीय उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली.

पहिली बस चालू करण्याचा मान अहमदनगर विभागाला मिळाला होता. त्या बसवर पहिल्या वाहकाचा मान शहरातील लक्ष्मणराव केवटे यांना मिळाला होता. केवटे यांनी वयाची 97 वर्षे पुर्ण करुन 98 वर्षात पदार्पण केले असता त्यांचा संघटनेच्या वतीने माळीवाडा येथील राहत्या घरी विशेष सत्कार करण्यात आला.

एसटी सेवा सुरु झाल्यानंतर पहिले वाहक असलेले लक्ष्मणराव केवटे सर्व परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांचे अभिमान आहे. त्यांनी खडतर काळात दिलेली सेवा प्रेरणादायी असल्याची भावना बलभीम कुबडे यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News