अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-दरवर्षी गणेशचतुर्थीसाठी आम्ही मुबंईवरुन बसेस सोडतो. पण यावर्षी सन्मानीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे आभार मानण्यासाठी राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान देऊन, मोदी साहेबांनी कोकणाला आशीर्वाद दिला म्हणून, या वर्षी ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन आम्ही गणेश चतुर्थीसाठी सोडणार आहोत.
जवळपास अठराशे नागरिक या ट्रेनमधून जावू शकतात. दादरवरून कणकवली, वैभववाडी, आणि सावंतवाडीला ही रेल्वे जाणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 8 नंबरवरुन ही रेल्वे सुटणार आहे.
हा प्रवास विनामूल्य असणार आहे. या प्रवासादरम्यान आम्ही आपल्याला एक वेळ जेवण सुद्धा देणार आहोत. तरी जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा घ्यावा असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
1 हजार 800 गणेशभक्तांसाठी कोकणातील गावी येण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहेत.
कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1 हजार 800 गणेशभक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेनने करता येणार आहे.
प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय करण्यात येणार आहे. दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून ही ट्रेन सुटणार आहे. आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करावं लागणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम