देवेंद्र फडणवीसांच्या भावाचे हार्ट अटॅकमुळे निधन !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. नागपुरात वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिजीत फडणवीस हे माजी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे एकुलते एक सुपुत्र होते. मूल शहरातील राईस मिल व्यापारी अभिजित फडणवीस 54 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्येष्ठ भाजप नेत्या , माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे पुत्र होते.

अभिजित, सध्या नागपुरात वास्तव्याला असून काही काळापासून आजारी होते. विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांचे सख्खे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस. अभिजीत फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिजीत माधवराव फडणवीस यांचे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले.

सध्या नागपुरात वास्तव्याला असलेले अभिजीत काही काळापासून होते आजारी असल्याची माहिती आहे. हृदय विकाराच्या झटक्याने नागपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe