अहमदनगर :- सूजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
राज्याचा विरोधी पक्षनेता असताना पक्ष आपल्यासाठी एक जागा मिळवू शकत नसेल तर अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढील भुमिका ठरवावी लागेल, असा इशारा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला दिला आहे.
डॉ.सुजय यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीचे चित्र मतदारांसमोर जाईल. त्यामुळे ना.विखे यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची तयारी पक्ष नेतृत्वापुढे दाखविल्याची आहे.
ना.विखे यांचे पुत्र डॉ.सुजय भाजपा प्रवेश करत असल्याने ते आपली भुमिका मांडण्यासाठी सोमवारी पक्षाच्या वरिष्ठांकडे दिल्लीत पोहचले होते.
प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाण सोबत होते. ना.विखे यांनी आपली भुमिका सोनिया गांधींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडल्याचे वृत्त आहे.