Onion News :- कांदा बेभरवशाचा असे का म्हटले जाते हे सध्या कांद्याला मिळत असलेल्या दरावरून स्पष्ट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या दराचा लहरीपणा ज्ञात आहे म्हणून येथील शेतकरी कांद्याच्या कमाईवर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये असे नेहमीच म्हणत असतात.
कदाचित कांद्या दराच्या याच लहरीपणामुळे कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी असे म्हणत असतील. खरं पाहता, या हंगामात सुरुवातीला कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Grower) मोठमोठी स्वप्न देखील साकारू लागला होता.
मात्र हंगामाच्या सुरुवातीला असलेला विक्रमी दर जास्त काळ टिकला नाही आणि अवघ्या दोन महिन्यात ते 3300 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा 900 रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmer) स्वप्नावर पाणी फिरले आहे आता कांदा उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत सापडला आहे.
मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्येवर रामबाण उपाय देखील आहे. सध्या खरिपातील (Kharif Season) लाल, रांगडा समवेतच उन्हाळी हंगामातील (Summer Season) उन्हाळी कांदा देखील विक्रीसाठी येऊ लागला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक करावी असा सल्ला दिला जात आहे.
खरिपातील लाल तसेच रांगडा कांदा साठवणूक करून ठेवणे निव्वळ अशक्य. मात्र, उन्हाळी हंगामातील उन्हाळी कांदा साठवणूक केला जाऊ शकतो. कांदा चाळीत शेतकरी बांधवांनी जर उन्हाळी कांदा साठवणूक करून ठेवला तर सुमारे आठ ते नऊ महिने टिकतो मात्र, यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागणार आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता उन्हाळी हंगामातील कांदा साठवणूकीकडे मोर्चा वळवला आहे. या अनुषंगाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठी धावपळ करत असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. सध्या बाजारपेठेत कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असून येत्या काही दिवसात कांदा दरवाढीचे चिन्हे दिसत नसल्याने कांदा साठवणुकीचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी आता कांदा साठवणुकीचा निर्णय घेतला खरा मात्र, कांदा हा नाशवंत असल्याने कांदा साठवणूक करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या मिळत असलेल्या दरात कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य असल्याने कांदा साठवणूक करण्याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक कल आहे.
आता कांदा साठवला तर भविष्यात यापासून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते. कांदा साठवणूक करताना कांदा काढणी झाल्यानंतर लगेचच साठवणूक करावा लागत नाही यासाठी कांद्याला उन्हात चांगले सुकवावे लागते. कांदा साठवणूक करताना नासलेला कांदा फेकून द्यावा लागतो, तसेच साठवणूक केल्यानंतर वेळोवेळी कांद्याची पाहणी करावी लागते व कांद्याची नासाडी झाली असल्यास नाचलेला कांदा कांदाचाळ मधून बाहेर फेकावा लागतो.
कांद्याला सध्या कवडीमोल दर मिळत आहे यामुळे वाहतुकीचा खर्च देखील काढणे अशक्य आहे. पण; जून-जुलैमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून कांदा आता साठवून ठेवायचा आणि जेव्हा चांगला दर मिळेल तेव्हाच विक्री करायचा असे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता अंगीकारले आहे.
कांदा साठवणूक करताना अशी घ्या काळजी-
»कांद्याची साठवणूक कांदा चाळीत करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. कांदा चाळीत एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात कांदा साठवून ठेवू नये यामुळे कांदा नासण्याची अधिक भीती असते. कांदा चाळीत ठेवण्यापूर्वी कांद्याला कमीत कमी तीन ते चारदा उन्हात सुकवले पाहिजे.
»कांदा वाढवल्यानंतर तो बारदानात भरून ठेवू नये, तसेच कांद्याचा ढीगही लावू नये. यामुळे खालच्या थरावरचा कांदा चढण्याची अधिक भीती असते.
»कांदा चाळीत कांदा टाकल्यानंतर त्याची वेळोवेळी पाहणी करावी लागणार आहे आणि पाहणी करताना नासलेला कांदा आढळून आल्यास त्याला कांदाचाळीतून बाहेर फेकावं लागणार आहे