राहुरी : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीला माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण करणारा शहाजी गाडेकर व त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी गजाआड केले.
शहाजी पत्नी संगीताचा छळ करत असे. त्याला कंटाळून ती मुलांना घेऊन माहेरी गेली. शहाजी व त्याच्या मैत्रिणीने संगीताच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
महिन्याभरापूर्वी संगीताने पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.