Tomato Farming: भारतात शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत असतात. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करणारे बहुतेक शेतकरी, लहान आणि मोठे निश्चितपणे टोमॅटोचे पीक लावत असतात.
खरं पाहता टोमॅटो हे भाजीपाला वर्गीय पिक कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देत असल्याने शेतकरी बांधवांचा याकडे कल वाढत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, टोमॅटो लागवडीकडे (Farming) शेतकऱ्यांचा वाढता कल आहे कारण की टोमॅटोचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे.
यामुळे साहजिकचं टोमॅटोला चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. टोमॅटोच्या शेतीतून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळावे असे प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला वाटते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते.
अशा स्थितीत भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगळुरूने ‘टोमॅटो कल्टीवेशन’ (Tomato Cultivation IIHR Application) नामक एक भन्नाट एप्लीकेशन सुरू केले आहे, ज्यामध्ये टोमॅटो लागवडीशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. साहजिकच या ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी बांधव टोमॅटोच्या शेतीतून चांगले गडगंज उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलुरुने विकसित केलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये टोमॅटो लागवडीसाठी योग्य माती आणि हवामान, जमीन तयार करणे, जैव खतांचा वापर, रोपवाटिका तयार करणे तसेच बियाणे दर, पुनर्लावणी, ठिबक सिंचन, खत आणि खत इत्यादींची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तज्ञांचा सल्ला आता मोबाईल वरच मिळणार आहे.
टोमॅटोचे उत्पादन, कीड नियंत्रण, रोग व्यवस्थापन, लक्षणे ओळखणे, तण व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन तसेच टोमॅटोचे सुधारित वाण आणि टोमॅटो उत्पादनाचे तंत्र याबाबत माहिती टोमॅटो लागवड मोबाईल अँपवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
विशेषत: रोग व्यवस्थापनाच्या संदर्भात हे मोबाईल अँप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. टोमॅटो पिकावरील रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार यासंबंधीची माहितीही या अँप्लिकेशनमध्ये देण्यात येत आहे.
टोमॅटो कल्टिव्हेशन अँप्लिकेशनमध्ये टोमॅटो लागवड, पीक व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोपवाटिका, पुनर्लावणी आणि संबंधित माहितीचे फोटो आणि व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण आधुनिक शेती टिप्स शिकू शकता.
टोमॅटोच्या शेतीतून शेतकरी आणि भागधारकांना फायदा होण्यासाठी, अँप्लिकेशनमध्ये पावसावर आधारित टोमॅटो लागवड, टोमॅटो पीक व्यवस्थापन, टोमॅटो प्रक्रियेशी संबंधित सामान्य माहिती देखील आहे.