सावधान : गर्भनिरोधक गोळ्या खाताय ? तुम्हाला होवू शकतो हृदयविकार…

Ahmednagarlive24
Published:

गर्भनिरोधक गोळ्या (OCP किंवा संप्रेरकांचा अंतर्भाव असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने म्हणजे निरोगी आणि तरुण स्त्रियांसाठी गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. यातील काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हार्टअटॅक, स्ट्रोक्स आणि रक्तात गुठळ्या होणे अशाप्रकारच्या गंभीर समस्यांचा धोका असू शकतो.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास खालील स्थितींमध्ये हृदयविकार व अधिक गुंतागुंतीची लागण होण्याची शक्यता अधिक असते.
>>
 वय ३५ वर्षाहून जास्त असल्यास.
>> रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रोलचा त्रास असल्यास.
>> धूम्रपान करत असल्यास.
>> यापूर्वी स्ट्रोक, हार्टअटॅक किंवा रक्तात गुठळी झाल्याची घटना घडली असल्यास.
>> मायग्रेन विथ ऑराचा त्रास असल्यास.

आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर शरीराला अधिक चांगल्या प्रकारे लागू होऊ शकेल, अशी संततीनियमनाची दुसरी एखादी अधिक सुरक्षित पद्धत आहे का, याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.

गर्भनिरोधक गोळ्या घेणा-या स्त्रियांच्या रक्तातील हृदयविकाराला कारणीभूत ठरणा-या स्निग्धांशांची पातळी बदलत असल्याचे दिसून येऊ शकेल.

उदाहरणार्थ : शरीरातील HDL ‘गुड’ कोलेस्ट्रोलची पातळी खाली गेलेली दिसेल; त्याचवेळी ट्रायग्लिसराइड्स आणि LDL ‘बॅड’ कोलेस्ट्रोलची पातळी वाढलेली दिसेल.

यामुळे हळूहळू धमन्यांच्या आतल्या बाजूस प्लाक म्हणून ओळखल्या जाणा-या चरबीयुक्त पदार्थाचा थर साठत जाईल. कालांतराने या प्लाकमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होईल किंवा त्यात अडथळा निर्माण होईल

व त्यातून हार्टअ‍ॅटॅक किंवा अन्जायना (छातीत दुखण्याचा एक प्रकार) यांसारखी समस्या उद्भवू शकेल. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेल्या एस्ट्रोजनमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment