संगमनेर :- तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकवर कारने दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. एक जण गंभीर जखमी झाला.
बाईजाबाई बाळू मधे (वय ३५, रा. वेलदरी, ता. अकोले) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे दादाभाऊ कडाळे व बाईजाबाई हे दोघे जण अकोले तालुक्यातील वेलदरी येथील आहे.
ते आंबीखालसा फाटा याठिकाणी महामार्ग ओलांडत असताना त्याच दरम्यान संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जाणारी कार भरधाव वेगात दुचाकीला जोराची धडक दिली.
यात दुचाकीवरील बाईजाबाई मधे या जागीच ठार झाल्या, तर दादाभाऊ कडाळे हे गंभीर जखमी झाले आहे. घारगाव पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
जखमी कडाळे यांना औषध उपचारासाठी संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.