Brinjal Farming : वांग्याची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल…! ‘या’ जातीच्या संकरित वांग्याची लागवड करा, 100% लाखोंत कमवणार

Ajay Patil
Published:
brinjal farming

Brinjal Farming : मित्रांनो भारतात अलीकडे भाजीपाला शेती (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला (Vegetable Crop) लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

भाजीपाला पिकांमध्ये वांग्याचा देखील समावेश केला जातो. या पिकाची शेती (Agriculture) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधव वांग्याच्या पिकांची (Brinjal Crop) मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात.

मित्रांनो खरे पाहता वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी बक्कळ पैसा कमवून देते. मात्र असे असले तरी जाणकार लोक वांग्याच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी वांग्याच्या सुधारित जातींची (Brinjal Variety) लागवड करण्याचा सल्ला देतात. मित्रांनो कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकांच्या सुधारित वाणांची पेरणी किंवा लागवड करणे अतिशय महत्त्वाचे असते.

वांग्याच्या पिकाच्या बाबतीत देखील असंच आहे. त्याच्या चांगल्या सुधारित किंवा संकरित जातींची (Hybrid Brinjal Variety) लागवड केल्यास निश्‍चितच अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असते. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी वांग्याच्या एका संकरित जातीची माहिती घेऊन आलो आहोत.

मित्रांनो आज आपण वांग्याच्या DBL 175 या जातीच्या शेती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण या संकरित जातीच्या वैशिष्ट्याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या जातीच्या विशेषता सविस्तर.

वांग्याची संकरीत जात डीबीएल-175

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ICAR-IARI, नवी दिल्ली या संस्थेने ही जात विकसित केली आहे. 2018 मध्ये ही जात विकसित झाली असून त्याच वर्षी प्रसारित करण्यात आली आहे. वांग्याची ही एक संकरीत जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या जातीच्या वांग्याची फळे लांब, दंडगोलाकार, चमकदार जांभळे रंगाचे असतात. वांग्याच्या या संकरित जाती पासून 400 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन घेतले जाऊ शकते.

या जातीच्या पेरणीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे आवश्‍यक असते. या संकरित जातीच्या वांग्याची लागवड फक्त खरीप हंगामातच केली जाऊ शकते. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या संकरित वांग्याची लागवड राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात केली जाऊ शकते.

निश्चितच या जातीच्या वांग्याच्या शेतीपासून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी या जातीच्या वांग्याची लागवड करण्याआधी तज्ञ लोकांचा एकदा सल्ला घेणे आवश्‍यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe