Cotton Rate : महाराष्ट्रात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
याशिवाय आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. एकंदरीत कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते.
शिवाय गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव (Cotton Market Price) मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या, कापसाच्या बाजार भावात (Cotton Bazar Bhav) कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव देखील मिळाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. गेल्या एक महिनाभरापूर्वी खानदेशात देखील मुहूर्ताच्या कापसाला सोळा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजारभाव मिळाला होता. मात्र सध्या कापसाचा बाजार भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उद्योगांकडून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात नसल्याचे जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. जाणकार लोकांच्या मते उद्योग कापसाचे दर स्थिर होण्याचे वाट पाहत आहे.
म्हणजेच जेव्हा कापसाचे दर स्थिर होतील तेव्हा उद्योगजगत कापूस खरेदी करायला सुरुवात करेल. सध्या कापसाला साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पासून ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते, जेव्हा कापसाचे बाजार भाव स्थिर होतील तेव्हा मोठ्या उद्योगांकडून कापसाची खरेदी केली जाण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत आगामी काही दिवसात जेव्हा उद्योग कापसाचे खरेदी करेल तेव्हा कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना कापसाची विक्री बाजारपेठेचा आढावा घेऊन करावी असा सल्ला दिला आहे.
निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापसाच्या बाजार पेठेतील चित्र पाहून टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास त्यांना कापसातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते सोयाबीनला या वर्षी पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणार आहे.
सोयाबीनची आवक वाढली तरी देखील या वर्षी सोयाबीनला एवढाच बाजार भाव मिळणार आहे. निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनला या वर्षी कमी बाजार भाव मिळणार असल्याचे चित्र आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी देखील बाजारपेठेतील चित्र पाहूनच सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी असा सल्ला देण्यात आला आहे.