Pune Breaking : पुणे तिथे काय उणे हीं म्हण मोठी प्रचलित आहे. पुणे हे सर्वच बाबतीत वर चढ असंल्याने सदर म्हण रूढ झाली आहे. पुण्यामध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. वाहतूककोंडी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आता नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिका कडून एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.
आता पुणे महापालिका कडून वाघोली ते लोहगाव येथून पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या रिंग रोडचे काम केले जाणार आहे. हा रिंग रोड जवळपास 5.7 किलोमीटर लांबीचा राहणार असून याला सर्विस रोड देखील राहणार आहे. या रस्त्यासाठी जवळपास 212 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी इस्टिमेट कमिटी कडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे.
या सदर होऊ घातलेल्या रस्त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडा मार्गे पिंपरी चिंचवड, मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना शहरात यावे लागणार नाही. म्हणजेच या रस्त्यामुळे वडगाव शेरी या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाला देखील या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असल्याचा विश्वास आहे.
मित्रांनो या रस्त्याबाबत अधिक माहिती अशी की, या रस्त्यासाठी आवश्यक सर्वेक्षणाचे आणि भूसंपादनाचे काम आता सुरु झाले आहे. हा सदर रिंग रोड 65 मीटर रुंदीचा राहणार आहे. हा रस्ता वाघोली येथून लोहगाव मधून पिंपरी चिंचवड मध्ये जातो. म्हणजेच या रस्त्यामुळे नगर रस्त्यावरील वडगाव शेरी खराडी येरवडा या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी निस्तारण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे पुणे महापालिका कडून या संदर्भात अहवाल तयार करण्यात आला असून याला एस्टिमेट कमिटीची मान्यता मिळाली आहे. या रस्त्याच्या बाजूने सर्विस रस्ता राहणार आहे. पावसाळ्याचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी गटाराची व्यवस्था तसेच विद्युत रोषणाईसाठी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच काही ठिकाणी सिग्नलची देखील व्यवस्था केली जाणार आहे.
यासाठी एकूण 212 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. यासोबतच शहरातील एकूण 57 रस्त्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी देखील 217 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. इस्टिमेट कमिटीने यासाठी देखील मान्यता दिली आहे. निश्चितच पुणे महापालिकाकडून केली जाणारी हीं कामे शहराच्या विकासाला गती देणार आहेत. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.