ऐकावे ते नवलचं..! शेंगदाणे, लसूण खाणारी ‘ही’ कोंबडी देते दिवसाकाठी 31 अंडी

Ajay Patil
Published:
viral news

Viral News : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जातो. कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामुख्याने अंड्याच्या उत्पादनासाठी आणि मांस उत्पादनासाठी केला जातो. खरं पाहता, एका कोंबडी पासून दिवसाकाठी एक अंड मिळते.

आत्तापर्यंत आपण एकाहून अधिक अंडी देणारी कोंबडी पाहिलेली नसेल. मात्र उत्तराखंडमध्ये अशी एक कोंबडी आहे जी दिवसाकाठी एक दोन, तीन, चार नवे तर तब्बल 31 अंडे देते. यामुळे सध्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये या कोंबडीची चर्चा केली जाऊ लागली आहे.

विशेष म्हणजे ही कोंबडी 31 अंडे तर देतेच शिवाय तिचा आहार देखील इतर कोंबड्यांपेक्षा अधिक आहे. ही कोंबडी दिवसाकाठी 200 ग्रॅम शेंगदाणे आणि लसूण खात असल्याचा दावा या कोंबडीच्या मालकाने केला आहे. दरम्यान आज आपण या कोंबडीविषयी जाणून घेऊया.

उत्तराखंडमधील कोंबडीने 31 अंडी दिलीत 

उत्तराखंड राज्यातील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन येथील मौजे बासोट येथील गिरीशचंद्र बुथानी यांनी पाळलेल्या कोंबडीने एका दिवसात 31 अंडी दिले असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. या कोंबडीने एका दिवसात 31 अंडी देऊन अनोखा विक्रम केला आहे. ही बातमी ऐकून सर्वजण ही कोंबडी पाहण्यासाठी गिरीश चंद्र यांच्याकडे पोहोचत आहेत. एवढेच नाही लोक या कोंबडीच्या जातीची माहिती देखील गोळा करत आहेत.

विशेष म्हणजे या कोंबडीने तास-दोन तासात 31 अंडी दिली नाहीत. तर कोंबडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हळूहळू अंडी देत ​​राहिली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तीने पहिले अंडे दिले. त्यानंतर दिवसभर अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू राहिली.

जवळपास रात्री 10 वाजेपर्यंत कोंबडीने 31 अंडी घातल्याचे सदर मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. एका दिवसात 31 अंडी देण्याची घटना प्रथमच ऐकल्याचे स्थानिकांचे देखील म्हणणे आहे. यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हायला हवी अशी मागणी देखील होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या कोंबडीच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे, ही कोंबडी शेंगदाणे आणि लसूण अधिक प्रमाणात खाते. एका दिवसात जवळपास 200 ग्राम शेंगदाणे या कोंबडीला लागतात. याशिवाय ती लसूण देखील मोठ्या प्रमाणात खाते. इतर अन्न मात्र ती फारशी खात नाही. निश्चितच ही एक अनैसर्गिक अशी गोष्ट असून दिवसाला 31 अंडी देणारी ही कोंबडी सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe