Car Run On Cow Dung : नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन कंपनीने गाईच्या शेणापासून मिळणाऱ्या द्रवरूप मिथेनच्या माध्यमातून ट्रॅक्टर चालवता येऊ शकतो असा दावा केला होता. दरम्यान आता मारुती सुझुकी या भारतातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनीने गाईच्या शेणापासून कार चालवण्यासाठी एका नवीन टेक्नॉलॉजी वर काम करत असल्याचा दावा केला आहे.
खरं पाहता आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, बॅटरी आणि सीएनजीच्या माध्यमातून कारला चालवलं जात आहे. मात्र आता गाईच्या शेणावर कार चालवण्याची मारुती सुझुकीची इच्छा असून यासाठी कंपनी एका टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.
खरं पाहता, पेट्रोल डिझेल मुळे वाढणारे प्रदूषण हा एक चिंतेचा विषय आहे. तसेच पेट्रोल, डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरही जात आहेत. अशा परिस्थितीत आता नवीन इंधनाच्या साह्याने वाहने चालवण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केली जात आहेत. मारुती सुझुकी कंपनीनेदेखील पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता कंपनी बायोगॅस वर कार चालवले जाऊ शकते का यावर संशोधन करत असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.
कार चालवण्यासाठी आता ही कंपनी बायोगॅसचा वापर करणार आहे. बायोगॅसची गाईच्या शेणापासून निर्मिती केली जाईल. विशेष म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेणाची उपलब्धता, अन बायोगॅसची उपलब्धता सहज होणार आहे. एका आकडेवारीनुसार आपल्या भारतात 70 टक्के वाहने सीएनजी वर धावतात.
आशा परिस्थितीत जर सीएनजी ला पर्याय म्हणून बायोगॅस आणला गेला आणि याचा वापर वाहन चालवण्यासाठी झाला तर याचा मोठा फायदा होणार असून यामुळे प्रदूषण तसेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
मारुती सुझूकी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात बायोगॅसमुळं आर्थिक विकासात मदत होणार आहे. खरं पाहता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन केलं जात असल्याने बायोगॅस बनवण्यासाठी ग्रामीण क्षेत्राचं मोठं योगदान राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आपल्या या नवीन तंत्रज्ञानासाठी कंपनीने भारत सरकार आणि राष्ट्रीय डेअर विकास बोर्डासोबत एमओयू केल्याची माहिती देखील एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान यां तंत्रज्ञानाच्या विकासासाठी यां बड्या कंपनीनं जपानमध्ये गाईच्या शेणापासून बायोगॅस बनविणाऱ्या वीज उत्पादन कंपनी फुजिसन असागिरी बायोगॅसमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. यां जपानी कंपनीसोबत मिळून तंत्रज्ञानावर काम करणं सुरू आहे. निश्चितच बायोगॅस वर जर कार धावली तर भारतीय अर्थव्यवस्था देखील वेगाने धावणार आहे.
यामुळे प्रदूषणावर देखील नियंत्रण मिळवता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. दरम्यान अजून हे तंत्रज्ञान विकसित झालेलं नसलं तरी देखील त्या दिशेने काम सुरू झालं असल्याने हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित केव्हा होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.