कौतुकास्पद ! शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न आता होणार मात्र एका रुपयात; काय आहे ‘हा’ उपक्रम, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
farmer marriage

Farmer Marriage : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. काही सामाजिक संस्था देखील शेतकरी हितासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असतात. असाच एक अभिनव उपक्रम एका सामाजिक संस्थेने राबवला असून या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न मात्र एका रुपयात लावून दिली जाणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातूनच सामूहिक विवाह सोहळा आयोजित होणार आहे. निश्चितच यामुळे शेतकरी नववधू-वरांसाठी ही एक आनंदाची पर्वणी राहणार असून आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या तसेच कष्टकरी शेतमजुरांच्या मुलांची लग्ने लांबणीवर पडणार नाहीत एवढे नक्की. या उपक्रमाबाबत अधिक माहिती अशी की भंडारा बीटीबी सब्जी मंडी परिवाराच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील नववधू-वरांच्या लग्नासाठी सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ एका रुपयात शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्न लावून दिली जाणार आहेत. यासाठी तूर्तास नोंदणी सुरू असून आतापर्यंत सहा जोडप्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. खरं पाहता बीटीबी सब्जी मंडी कायमच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. कोरोना काळात देखील या संस्थेने आर्थिक सहकार्य करत सामाजिक दायित्व यशस्वीरित्या पार पाडल आहे.

यासोबतच या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याला विदेशी बाजारपेठ मिळवून देण्यात आली आहे. निश्चितच या संस्थेने भंडारा जिल्ह्याचे नाव मोठे करण्यात तसेच शेतकऱ्यांचे आयुष्य सुधारण्यास खारीचा वाटा उचलला आहे. एवढेच नाही तर आता या संस्थेच्या माध्यमातून गरीब शेतकरी, शेतमजूर, किरकोळ भाजीपाला विक्रेते यांच्या मुला मुलींचे लग्न लावून देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निश्चितच या संस्थेने राबवलेला हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रातीलच संस्कृतीचे बखान करत आहे.

संस्थेच्या माध्यमातून गरजू शेतकरी, शेतमजूर, भाजीपाला विक्रेते यांच्या नववधू-वरांच्या लग्नासाठी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान देखील केले जात आहे. नोंदणी करताना शाळा सोडल्याचा दाखला, स्वतःचे आधार कार्ड, आई-वडिलांचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज चार फोटो, आई-वडिलांचे दोन प्रतीत फोटो, स्थायी पत्त्याचा पुरावा यांसारख्या कागदपत्रांची पूर्तता मात्र करावी लागणार आहे. निश्चितच बी टी बी संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकच केले जात आहे.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe