Maharashtra Draught 2023 : यावर्षी भारतासह संपूर्ण आशिया खंडात अलनिनोच्या प्रभावामुळे दुष्काळ पडणार असे भाकीत अमेरिकन हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत निश्चितच भर पडली आहे. वास्तविक आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे.
परिस्थितीत दुष्काळ पडला पर्जन्यमानात बदल झाला तर निश्चितच याचा परिणाम सरळ शेती व्यवसायावर होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नापिकी, कमी उत्पादन यांसारख्या समस्या भेडसावणार आहेत. शिवाय याचा परिणाम म्हणून महागाईमध्ये तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. निश्चितच यामुळे सर्वसामान्य जनतेला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता महाराष्ट्रातील हवामानाबाबत एका संस्थेने मोठा दावा केला आहे. असार सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायझर्स या सोशल इम्पॅक्ट स्टार्ट-अपने आपल्या आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या सहाव्या मूल्यांकन अहवालात महाराष्ट्रातील हवामानाबाबत मोठा गंभीर ईशारा जारी केला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्याचा नाद नाही करायचा ! वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याने शेतात बनवलं फाइव्ह स्टार मचान; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा, पहा….
यां अहवालात असं म्हटलं गेलं आहे की येत्या काही महिन्यात राज्यात उष्णतेची लाट येईल, त्यानंतर पाण्याची टंचाई आणि अतिवृष्टी होणार आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे क्षेत्र विशेष प्रभावित होणार आहे. सजीव सृष्टीला आणि शेती पिकांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हवामान बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेत परिणाम जाणवतील.
काही ठिकाणी अतिवृष्टी व इतर काही ठिकाणी दुष्काळ राहील त्यामुळे निश्चितच पीक उत्पादनात घट होईल आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे अटळ आहे. असे असले तरी मात्र काही पिकांसाठी उबदार हवामान मानूबेल आणि चांगले उत्पादन देखील मिळेल असं सांगितलं जात आहे. या अहवालात असं देखील म्हटलं गेलं आहे की गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने महापूर आणि भीषण दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना केला आहे.
हे पण वाचा :- संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता ‘हे’ काम करावं लागणार, नाहीतर….
यामुळे भविष्यात ही परिस्थिती आणखी सामान्य होण्याची शक्यता आहे. निश्चितच या संस्थेने वर्तवलेला हा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर शेतीच क्षेत्र विशेष प्रभावित होणार असून यामुळे इतरही क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम जाणवणार आहेत. याशिवाय या अहवालात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे अशा परिस्थितीत समुद्र पाणी पातळीत वाढ झाली तर याचा परिणाम म्हणून समुद्र काठावर वसलेल्या शहरांना वेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं. निश्चितच अमेरिकन हवामान विभागाच्या पाठोपाठ यां संस्थेने देखील हवामानात मोठा बदल होण्याचा दावा केला असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे.
हे पण वाचा :- कडू कारल्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! 3 एकरात लागवड केली अन तब्बल 10 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा