Ghat In Maharashtra :- महाराष्ट्र भूमीला निसर्गाने वरद हस्ताने दिले असून अनेक नैसर्गिक संपदा महाराष्ट्राला लाभलेली आहे. यामध्ये वृक्षसंपदा असो की डोंगरदऱ्या, या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या, अवखळपणे वाहणारे धबधबे सगळे कसे आतुलनीय असे महाराष्ट्रात बघायला मिळते. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला अनेक डोंगर रांगा लाभले असून त्यामधून अनेक घाट रस्ते आणि घाट परिसर हा देखील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घाट परिसरामध्ये मनसोक्त फिरण्याचा आनंद काही मनाला वेगळीच अनुभूती देऊन जातो.जर तुम्हाला देखील पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही घाट परिसरांना भेट देण्याचा विचार असेल तर या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घाटांची माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख घाट
1- कात्रज घाट–
हा घाट पश्चिम घाटाचा एक भाग असून महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ हा घाट आहे. हे दख्खनचे पठारावर वसलेले असून जे दक्षिण आणि मध्य भारताचा बराच भाग व्यापते. कात्रज घाटाचा विचार केला तर या ठिकाणाच्या फिरत्या टेकड्या, हिरवीगार झाडी आणि या ठिकाणी असणारे तलाव हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा परिसर मंदिरे तसेच तीर्थक्षेत्रे आणि इतर अनेक सांस्कृतिक ठिकाणांनी नटलेला आहे.
या घाटामध्ये तीर्थक्षेत्र तसेच ऐतिहासिक मंदिरे आणि चित्त थरारक दृश्य पाहण्याची हौस असेल तर कात्रज घाट आहे चांगला पर्याय आहे. कात्रज घाटाच्या सभोवताली अनेक जंगले आणि टेकड्या असून या ठिकाणी वनस्पतींच्या खूप प्रजाती बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजाती देखील या ठिकाणी आहेत. नैसर्गिक संपदेसोबतच अनेक मंदिरे जसे की श्रीकृष्ण, भगवान शिव आणि इतर हिंदू देव देवतांचे मंदिर या ठिकाणी असून आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील कात्रज घाटाचे महत्त्व आहे.
हा परिसर प्रामुख्याने पश्चिम घाटाचा एक भाग आहे. पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्या जवळून जाणारी एक पर्वतरांग असून ती समृद्ध जैवविविधता, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक महत्त्व यासाठी खास करून ओळखली जाते. पश्चिम घाट हा जगातील जैविक विविधतेच्या आठ उत्तम ठिकाणांपैकी एक ओळखला जातो.
2- दिवा घाट–
दिवेघाट हा त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक आणि विहंगम दृश्यांमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील दिवे घाट निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. दिवेघाट मुंबई ते पुणे या महामार्गाच्या अगदी जवळ आहे. पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावर दिवे घाट आहे. दिवेघाट समुद्रसपाटीपासून 1200 फूट उंचीवर आहे. या ठिकाणचे तापमान कायम 20°c ते 30 अंश सेंटीग्रेड पर्यंत असते.
पर्यटकांना ट्रेकिंगची आवड आहे असे पर्यटकांसाठी हा घाट म्हणजे एक चांगली संधी आहे. एवढेच नाही तर या ठिकाणी अनेक चित्त थरारक असे धबधबे देखील पाहायला मिळतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर दिवे घाटातील खंडी धबधबा आणि मधेघाट धबधबा हे दिवे घाटातील प्रसिद्ध धबधबे आहेत. तसेच ज्यांना पक्षी निरीक्षण करण्याची आवड आहे अशा पर्यटकांसाठी दिवे घाट हे चांगले स्थळ असून या ठिकाणी अनेक पक्षांच्या प्रजाती असून त्यांचे निवासस्थान देखील आहे.
महत्वाचे म्हणजे पर्यटकांना दिवेघाटामध्ये राहण्यासाठी अनेक लक्झरी रिसॉर्ट्स आणि कमी किमतीच्या हॉटेल देखील निवासासाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी अनेक कॅम्प ग्राउंड आणि होम स्टे असून ते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खूप चांगला अनुभव या ठिकाणी येतो. या ठिकाणी तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ खायला मिळतात. तसेच बरेच लहान असे भोजनालय देखील आहेत.
3- आंबोली घाट–
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे ठिकाण असून या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो व त्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आंबोली घाट हा पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचा परिसर असून या घाटामध्ये पारपोरी गावाजवळ असलेला धबधबा हा खूप मनमोहक आहे. एकदा पावसाळ्याची सुरुवात झाली की या ठिकाणी अनेक धबधबे प्रवाहित होतात होते वाहू लागतात. हा 30 किलोमीटर लांबीचा घाट असून या ठिकाणी नांगरतास धबधबा, जंगली तसेच हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेव मंदिर, सनसेट पॉईंट आणि कावळे शेत पॉइंट पाहण्यासारखे आहेत.
आंबोली घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून देखील ओळखले जाते. याच्या चारही बाजूंनी हिरवळ डोंगराच्या रांगा असून या ठिकाणी पडणारे धुके हे पर्यटनाचे खूप चांगले आकर्षण आहे. आंबोली घाट पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा घाट मार्ग असून या ठिकाणाहून प्रवास करण्याचा एक अद्भुत वेगळाच आनंद असतो. या ठिकाणी आंबोली येथे असणारा धबधबा हा खूप प्रसिद्ध असून हा धबधबा पाहण्यासाठी आंबोली घाटामध्ये पर्यटकांची कायम गर्दी असते. तसेच आंबोली घाटाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यांवर माकडे आणि त्यांची छोटी छोटी पिल्ले एक वेगळीच मजा देऊन जातात.
हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदी या ठिकाणी एका गुहेत उगम पावते व पुढे वाहत जाते. या ठिकाणी एक महादेवाचे मंदिर आहे व त्याच्या बाजूलाच एक कुंड आहे. या कुंडामध्ये बरेच पर्यटक आंघोळीचा आनंद लुटतात. तसेच याच्यापुढे आठ किलोमीटर अंतरावर नांगरतास धबधबा असून डोंगर रंगाच्या चिंचोळ्या वाटेतून वाहणारा हा पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांना व्यवस्थित पाहता यावा याकरिता गॅलरी देखील तयार करण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी असणारे कावळे सात पॉईंट हा खूप महत्त्वाचा पॉईंट असून या ठिकाणी असणारी मोठी दरी आणि समोरून येणारे ढग आणि त्यातून येणारे सूर्यकिरण यामुळे या पॉइंटला एक आकर्षक असं सौंदर्य लाभते.
4- खंबाटकी घाट–
मुंबई- बेंगलोर महामार्गावर साताऱ्याजवळ खंबाटकी हा घाट आहे. या घाटावर आल्यानंतर या ठिकाणी असलेले खामजाई मंदिर हे अतिशय प्राचीन असे मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी डोंगरात खोदलेले खांब टाक्या असून या ठिकाणी वर्षभर पाणी असते. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा प्राचीन घाट मार्ग असून या घाटाच्या अगदी जवळ असणाऱ्या शिरवळ आणि पारगाव खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या प्राचीन लेण्या खूप पाहण्यासारखे आहेत.
या घाटात मंचर या ठिकाणी प्राचीन कुंड असून ते 14 वा शतकात बांधले असल्याचा उल्लेख त्या ठिकाणी असलेल्या लेखांवरून समजतो. एवढेच नाही तर पुढे आल्यानंतर शिरवळ या ठिकाणी यादवकालीन पानपोई असून देखील महत्त्वाचे आहे. या घाटात ज्या टाकी आहेत त्याकाळी व्यापारी आणि प्रवासी मंडळींच्या सोयीसाठी खोदण्यात आली असावी असे पुरातत्व अभ्यासकांचे मत आहे. या घाटातून कोल्हापूर तसेच सातारा सांगली कडे जाणाऱ्या बहुतांश प्रवासी खंबाटकी घाटातील या खांब टाक्याजवळ थांबतात आणि या ठिकाणाचे थंडगार पाणी पिऊन मन तृप्त करतात.
नेमक्या या खांब टाक्या कधी खोदल्या गेल्या याचा नेमका कालावधी सांगता येत नसला तरी 18 व्या शतकामध्ये पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या टाक्यांसाठी 45 हजार रुपये खर्च करून डागडुजी केली असल्याचे साताऱ्याजवळ धावडशी येथे ब्रह्मेंद्र स्वामी यांची समाधी ठिकाणी असलेल्या फलकावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.