मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या वंदे भारत ट्रेन बद्दल महत्वाची अपडेट

Updated on -

 देशातील महत्त्वाची शहरे आता वंदे भारत या देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड ट्रेनने जोडले जात असून या माध्यमातून शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होणार आहे. सध्या भारतामध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आले असून यामधील पाच वंदे भारत या महाराष्ट्रात सुरू आहेत.

वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असून प्रवासाचे अंतर देखील कमी होण्यास मदत होत आहे. जर आपण महाराष्ट्रातील पाच वंदे भारत एक्सप्रेसचा विचार केला तर यामधील मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून नुकतीच या दोन्ही गाड्यांच्या थांब्यांबाबत रेल्वे बोर्डाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.

 या दोन्ही वंदेभारत एक्सप्रेस आता कुठे थांबतील आणि कुठे थांबणार नाहीत?

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आता कल्याण स्टेशनवर तर मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ठाणे स्टेशनवर थांबणार असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे थांबे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. परंतु याबाबत जर आपण मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसचा विचार केला तर आता कल्याण स्टेशनवर थांबेल परंतु अगोदर असलेल्या दादर स्टेशनवर थांबणार नाही कारण हा थांबा आता रद्द करण्यात आला आहे.

उद्यापासून म्हणजे चार ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई ते शिर्डी ट्रेन क्रमांक 22223 आणि 22224 गाडीला कल्याण स्टेशनवर थांबा देण्यात आला असून त्यासोबतच मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक 22225 आणि 22226 या ट्रेनला ठाणे स्टेशनवर चार ऑगस्ट पासून थांबा देण्यात येणार आहे.

 या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक

1- मुंबईसाईनगर वंदे भारत ट्रेन मुंबई ते साईनगर शिर्डी ट्रेन क्रमांक 22223 सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सीएसएमटी स्टेशन वरून सुटेल व ती आता नवीन निर्णयानुसार दादर या ठिकाणी थांबणार नाही. सी एस एम टी वरून सुटल्यानंतर सरळ ठाण्याला सकाळी सहा वाजून 49 मिनिटांनी पोहोचेल आणि नवीन थांबा मिळालेल्या ठिकाणी म्हणजेच कल्याण स्टेशनवर सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी पोहोचेल व या ठिकाणहून सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी सुटेल.

त्यापुढे नाशिक रोड स्थानकावर ती सकाळी आठ वाजून 57 मिनिटांनी पोहोचेल आणि आठ वाजून 59 मिनिटांनी त्या ठिकाणाहून निघेल. तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई ही परतीची ट्रेन नाशिक रोडला रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल आणि रात्री सात वाजून 27 मिनिटांनी सुटेल.

या ठिकाणाहून निघाल्यानंतर कल्याणला रात्री नऊ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल आणि नऊ वाजून 47 मिनिटांनी कल्याण स्टेशन वरून सुटून ठाणे स्टेशनवर रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी पोहोचेल आणि रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी ठाणे स्टेशन वरून सुटेल.

2- मुंबईसोलापूर वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर ट्रेन क्रमांक 22225 ट्रेन सीएसएमटी स्टेशन वरून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी सुटून दादर स्टेशनवर दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल व या ठिकाणहून दुपारी चार वाजून 17 मिनिटांनी निघेल. या वंदे भारत एक्सप्रेसला आता ठाणे स्टेशनला थांबा देण्यात आला असून या स्टेशन वरती दुपारी चार वाजून 33 मिनिटांनी पोहोचेल आणि चार वाजून 35 मिनिटांनी निघेल.

त्यानंतर कल्याण स्टेशनवर चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचेल आणि चार चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पुढच्या प्रवासाला निघेल. तसेच सोलापूर ते मुंबई ही परतीची ट्रेन कल्याण स्टेशनवर सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांनी येईल आणि या ठिकाणहून अकरा वाजून 35 मिनिटांनी निघेल.

त्यानंतर ठाणे स्टेशनवर सकाळी 11 वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल आणि अकरा वाजून 52 मिनिटांनी ठाणे स्टेशन वरून निघून दादर स्टेशनवर दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी पोहोचेल  आणि दादर स्टेशन वरून बारा वाजून 14 मिनिटांनी सुटेल. अशा पद्धतीने आता या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला नवीन थांबा देण्यात आले असून अशा पद्धतीचे या गाड्यांचे वेळापत्रक आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe