Sangamner News : संगमनेरमधील ‘जादू’गार मुलीचा सातासमुद्रापार डंका, आ तांबेनी केलं कौतुक…

Published on -

संगमनेरमधील १४ वर्षीय रियाची, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल प्रतिनिधी ‘जादू’ची किमया दाखवत संगमनेर तालुक्यातील रिया कानवडे या बाल कलाकाराने अवघ्या १४ वर्षात आपली छाप आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे.

लहान वयात मिळालेल्या संधीचे सोने करत, ही बाल कलाकार ग्रामीण भागात शालेय अभ्यास करताना सातासमुद्रापार तिने केलेली ‘जादू’ हा रियासाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. याचसंबंधित आ. सत्यजीत तांबे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) यावर कौतुक केले.

जादू केल्याप्रमाणेच ही छोटी जादूगार आता या क्षेत्रात ही आपली छाप उमटवत आहे. रिया सध्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (निमगाव पागा) इयत्ता दहावीत शिकत आहे. तिचे वडील भागवत कानवडे हे १७ वर्षांपासून जादूचे प्रयोग करीत आहेत.

रिया कानवडे ही सर्वात कमी वयाची जादूगार म्हणून आंतरराष्ट्रिय पातळीवर रियाची दखल घेण्यात आली आहे. अवघ्या १४ वर्षीय रियाने आता पर्यंत ११ देशात जादूचे प्रयोग केले आहेत. दरम्यान, थायलंड व फिलिपिन्स या देशात डिसेंबर-२०२३ मध्ये होणाऱ्या जादूगारांच्या स्पर्धेसाठी तिला आमंत्रित करण्यात आले आहे.

याबद्दल आ. सत्यजीत तांबे यांनी रियाचे मनापासून अभिनंदन केले. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्याची आता सातासमुद्रापार वाहवा केली जात आहे. अशातच जादूची कला जोपासत असतानाच रिया अभ्यासालाही तितकेच महत्व देते, याबद्दल तिचे खरोखर कौतुक वाटते. असे विधान तांबे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जादू’ केली आहेस असं म्हणत स्पर्धेसाठी शुभेच्छा देत रियाला पुढील स्पर्धेत यश मिळवशील असा विश्वास देखील आ. सत्यजीत तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe