Toyota Battery: 10 मिनिट बॅटरी चार्ज केल्यावर बाराशे किलोमीटर पळतील इलेक्ट्रिक गाड्या! ‘ही’ कंपनी बनवत आहे पावरफुल बॅटरी

Ajay Patil
Published:
toyota electric battery

Toyota Battery:- पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषणासारख्या समस्यांमुळे आता अनेक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. यामध्ये कार तसेच दुचाकी आणि इलेक्ट्रिक स्कूटर यांचे देखील  निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत.

तसेच ग्राहकांकडून देखील या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असल्याचे सध्या चित्र आहे. आता आपल्याला माहित आहेच की इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटऱ्यांचा वापर केलेला असतो व बॅटरी चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावते. वाहनामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरीच्या क्षमतेवर अवलंबून असते की बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर जाऊ शकेल म्हणजेच किती किलोमीटरचे रेंज देईल.

त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी कोणत्या क्षमतेची आहे याला खूप महत्त्व आहे. परंतु इलेक्ट्रिक गाड्यांना चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि त्या दृष्टिकोनातून मिळणारी रेंज खूप कमी असल्यामुळे वाहनधारकांना अनेक प्रकारचा समस्या निर्माण होतात. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आता जपानी वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेली टोयोटा ही कंपनी एक नवीन अशी बॅटरी तयार करत असून त्याच्यामुळे वाहनांना तब्बल 1200 किलोमीटरची रेंज मिळेल असं देखील माहिती समोर आली आहे.

 टोयोटा बनवत आहे पावरफुल बॅटरी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जपानी वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेली टोयोटा ही कंपनी नव्या प्रकारची बॅटरी तयार करत असून ही बॅटरी तब्बल एका वेळी फुल चार्ज केल्यानंतर तब्बल बाराशे किलोमीटर एवढी रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे. याबाबत टोयोटा या कंपनीने माहिती दिली असून त्यांच्या मते ही कंपनी सॉलिड स्टेट बॅटरी तयार करत आहे.

तसेच या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे या बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी फक्त दहा मिनिटांचा कालावधी लागेल व एकदा पूर्ण चार्ज झाली की तब्बल ती बाराशे किलोमीटर ची रेंज देऊ शकेल. ही बॅटरी तयार करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 2027 किंवा 2028 या वर्षापर्यंत या बॅटरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहे अशी देखील माहिती टोयोटा कडून मिळाली आहे.

याकरिता टोयोटा या कंपनीने इडेमित्सु या कंपनीशी करार केला असून इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला किंवा बीवायडी यासारख्या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी हा करार खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. टोयोटा  बनवत असलेल्या सॉलिड स्टेट बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या इलेक्ट्रिक कार मध्ये ज्या काही बॅटऱ्या वापरण्यात येतात त्या लिथियम आयन बॅटरी आहेत.

यामधील लिथियम हा एक महाग पदार्थ असल्यामुळे त्या बॅटऱ्यांची किंमत जास्त असते. परंतु टोयोटा बनवत असलेल्या सॉलिड स्टेट बॅटरी मध्ये वापरण्यात येणारे जे घटक असतात ते सगळे घन अवस्थेमध्ये असतात व त्यामुळेच या बॅटरींची स्टॅबिलिटी आणि सुरक्षितता ही वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe