Banking update : दिवाळीपूर्वीच ICICI आणि बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला झटका, वाचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

Sonali Shelar
Published:
Banking update

Banking update : तुम्ही देखील बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन बँकांनी दिवाळीपूर्वीच आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या खिशावर भार पडेल, तसेच गग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या बँकांनी काय बदल केले आहेत ते पाहूया.

या दोन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवला आहे. यामुळे MCLR संबंधित कर्जाचा EMI वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही बँकांचे हे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक समितीच्या बैठकीनंतर बँकांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, दरांमध्ये आणखी वाढ होण्यास अजून वाव आहे.

ICICI बँक MCLR दर

MCLR मध्ये दुरुस्ती केल्यानंतर, ICICI बँकेचा रातोरात आणि एक महिन्याचा MCLR आता 8.50 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा MCLR सध्या अनुक्रमे 8.55 टक्के आणि सहा महिन्यांचा दर 8.90 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 9 टक्के आहे.

बँक ऑफ इंडियाचे MCLR दर

MCLR वाढल्यानंतर, बँक ऑफ इंडियाचा रात्रभर आणि एक महिन्याचा MCLR अनुक्रमे 7.95 टक्के आणि 8.20 टक्के आहे. 3 महिन्यांचा MCLR आता 8.35 टक्के आणि 6 महिन्यांचा MCLR 8.55 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR 8.75 टक्के आहे, तर 3 वर्षाचा MCLR 8.95 टक्के आहे.

MCLR दर म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट आधारित कर्ज दर हा बँक कर्जासाठी आकाराला जाणारा किमान व्याज दर आहे. MCLR पूर्वी भारतातील बँका ‘बेस रेट’ वापरत असत. RBI द्वारे MCLR 1 एप्रिल 2016 रोजी लागू करण्यात आला. MCLR मधील बदलांचा कर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe