बंगळुरू देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु आता एक जिंताजनक बाब समोर आली आहे. जे जिल्हे कोरोनमुक्त होते ते जिल्हे व्हायरसचे हॉटस्पॉट ठरत आहेत.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियातील लाइफ कोर्स एपिडेमिओलॉजीचे प्रमुख प्राध्यापक गिरिधर आर बाबू यांनी या बाबत चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये समानता दिसून येणार नाही.
या जागतिक महासाथीशी लढण्यासाठी योग्य देखरेख आणि योजना तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. बाबू म्हणाले, “पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोना संक्रमण झापाट्यानं वाढत आहे.
या राज्यात मृत्यूदर कमी करण्याच्या योजना वेगळ्या असतील. तर दुसरीकडे इतर राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू शकतात, त्यासाठी आपण तयारीत राहायला हवं” आपल्याला 2 श्रेणीत राज्यांमध्ये देखरेख ठेवण्याची गरज आहे.
जर असं नाही झालं तर भारताला इतर देशांच्या तुलनेत जे यश मिळालं आहे, ते कायम राहणार नाही. प्रत्येक राज्य आता एका देशाप्रमाणे आहे.
प्रत्येक राज्यात कोरोनाव्हायरसचं संक्रमणात वाढ वेगवेगळ्या कालावधीत होईल. आपण कमी संक्रमण असलेल्या क्षेत्रामध्ये ही वाढ टाळू शकतो”, असं त्यांनी सांगितलं. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 90927 पोहोचली आहे, तर 2872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वेगवेगळ्या कालावधीत वाढतील आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं, असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.