Property Rule: तुमची ‘ही’ छोटीशी चूक भाडेकरूला देऊ शकते तुमच्या मालमत्तेवर मालकी हक्क! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
property rule

Property Rule:- ग्रामीण भाग असो की मोठी शहरे या ठिकाणी अनेकदा घरे भाडेतत्त्वावर दिली जातात. याशिवाय दुकान किंवा गाळा इत्यादी मालमत्ता देखील भाडेतत्त्वावर मोठ्या प्रमाणावर देण्यात येते. म्हणजेच खेड्यांपासून तर मोठ्या शहरांपर्यंत लोक अतिरिक्त उत्पन्नाकरिता स्वतःची मालमत्ता भाड्याने देतात.

असे व्यवहार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण देखील नसते. परंतु बऱ्याचदा संबंधित भाडेकरू सहजतेने मालमत्तेवरील हक्क सोडत नाही. तेव्हा मात्र अशा प्रकारामध्ये समस्या निर्माण होतात. मालमत्ता कायद्याचा विचार केला तर याबाबत काही नियम देखील आहेत. ते देखील आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे असते.

 मालमत्ता कायद्यात काय आहेत नियम?

जर आपण मालमत्ता कायद्याचा विचार केला तर यामध्ये जर एखादा भाडेकरू सलग बारा वर्षे त्या घरामध्ये राहिला तर तो संबंधित मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. यासंबंधीच्या अटी शर्ती खूप कडक आहेत. परंतु तरीदेखील अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता विवादामध्ये सापडण्याची शक्यता असते. समजा यामध्ये तुम्ही एखादी मालमत्ता भाड्याने दिली आहे किंवा ती रिकामी ठेवली आहे.

अशा परिस्थितीमध्ये बारा वर्षापासून त्या जागेवर इतर कोणी राहत असेल तर ती व्यक्ती या मालमत्तेवर दावा करू शकते. तुम्ही भाडेकरु कडून दर महिन्याला पैसे घेत असला तरीही तुमची मालमत्ता तुमच्या हातातून जाऊ शकते. मालमत्तेसंबंधीतील हा कायदा मात्र सरकारी मालमत्तेला लागू होत नाही. सरकारी मालमत्तेचा ताबा संबंधित कायद्यामध्ये वेळ वाढतो. बारा वर्षानंतर केवळ वैयक्तिक मालमत्तेवर दावा केला जाऊ शकतो.

 यापासून वाचण्याकरिता काय करता येईल?

त्यामुळे तुमची कोणतीही मालमत्ता दुर्लक्षित ठेवणे कधीही भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. तीही मालमत्ता भाड्याने दिली असेल तर निश्चितपणे भाडे करार करून घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा अनेक ठिकाणी दिसून येते की लोक भाडेकरार न करता आपले घर भाड्याने देतात आणि फक्त भाडे घेत राहतात.

परंतु असे अजिबात करू नये. भाडेकरार हा 11 महिन्यांसाठी असतो व दर 11 महिन्यांनी त्याचे नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या मालमत्तेवर कोणीतरी बेकायदेशीरपणे हक्क जमवण्याचा किंवा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या विरोधात ताबडतोब न्यायालयात जाणे गरजेचे आहे.

कारण बारा वर्षाच्या कालावधीनंतर या मालमत्तेवर कोर्टातही तुमची सुनावणी होऊ शकत नाही. तसेच तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेळोवेळी भाडे करू देखील बदलू शकतात व होणाऱ्या समस्येपासून वाचू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe