तुम्हाला माहित आहेत चहाचे हे दुष्परिणाम ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- चहामुळे तंदुरुस्ती जाणवते, फ्रेश वाटते. काम करण्यास उत्साह वाढतो. त्यात अजून आल्याचा चहा असेल, तर तो सर्दी-डोकेदुखीही कमी करतो. मात्र, चहाचे सेवन किती करावे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

कधी-कधी जेवणाच्या आधी चहा घेतला, तर नंतर भूक लागत नाही. मग त्याचा परिणाम भुकेवर होऊन आपले आहाराचे वेळापत्रक बिघडून जाते.

काहींना सकाळ, संध्याकाळ असा चहा लागतो. इतर वेळी चहाचा वासही चालत नाही. मात्र, वारंवार चहा पिणा-यांचे काय? जसे चहा आपल्याला ताजेतवाने बनवते, तसे त्याचे काही दुष्परिणामही दिसून येतात.आज आपण वाचूयात चहाचे हे दुष्परिणाम !

अ‍ॅसिडिटी : वारंवार चहा प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवतो. सकाळी उठल्या-उठल्या चहा पिणे, वारंवार चहा पिण्याची सवय असणे, जेवणाआधी.. जेवणानंतर लगेचच चहा पिणे.. आदी चहा पिण्याच्या सवयीने अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते.

भूक न लागणे : चहा प्यायल्याने भूक मरते. जेवणाच्या वेळी चहा प्यायल्यास, त्याचा परिणाम भुकेवर होतो. चहामुळे भूक लागत नाही. ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात अनेकदा चहाचे सेवन केले जाते. परिणामी जेवणाची वेळ टळून कधी जाते, हे देखील अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. याचा परिणाम आरोग्यावर होऊन आजारी असल्यासारखे वाटणे, शरीर कृश वाटणे, आदी गोष्टी जाणवतात.

झोपेवरील परिणाम : काहींना चहा इतका लागतो की, अक्षरश: त्याचा परिणाम झोपेवर दिसून येतो. झोपेआधी वाचन करताना.. टीव्ही पाहताना.. एखादा ताण असेल, तर तो घालवण्याकरिता चहाचे सेवन केले जाते. मात्र, याचा परिणाम निद्रेवर दिसून येतो. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवतो.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment