अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- एखाद्या रुग्णाला श्वास घेणे शक्य नसते, तेव्हा डॉक्टर्स अशा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवतात, ज्यामुळे श्वास घेण्यास मदत होते. काही वेळा ऑपरेशन थिएटर्समध्ये शस्त्रक्रियेच्या सोयीसाठी व्हेंटिलेटरचा वापर होतो.
रुग्णाला अॅनास्थेशिया देऊन एक छोटी नळी (एंडोट्रॅकियल टय़ूब) तोंडामध्ये टाकली जाते, जिचे दुसरे टोक मशीनला जोडलेले असते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास मदत होते.
या मशीनलाच ‘व्हेंटिलेटर’ असे म्हणतात या संपूर्ण प्रक्रियेला यांत्रिक श्वासोच्छ्वास किंवा ‘मेकॅनिकल व्हेंटिलेशन’ असे नाव आहे.
ही यंत्रे रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाच्या लयीशी परिणामकारकरीत्या जुळवून घेतात. त्यामुळे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया अधिक सुलभतेने होण्यास मदत होते.
सर्वसाधारणपणे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला भूल देण्यात आलेली असते किंवा गुंगी आणणारी, वेदना बोथट करणारी औषधे देण्यात आलेली असतात, जेणेकरून त्यांना चांगला आराम मिळावा व वेदना होऊ नयेत.
व्हेंटिलेटरवरील रुग्ण झोपाळल्यासारखे दिसतात त्यामागे हेच कारण आहे. असे असले तरीही येथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि ती म्हणजे व्हेंटिलेटर ही केवळ मानवी श्वसनयंत्रणेला आधार देणारी यंत्रणा आहे.
त्याव्यतिरिक्त हृदय आणि इतर इंद्रियांचे कार्य नैसर्गिकरीत्या सुरू असते. व्हेंटिलेटरमुळे प्राणवायूचा चांगला पुरवठा होत असल्याने इतर इंद्रियांचे कार्यही चांगले चालण्यास मदत होते.
अशावेळी रुग्णाच्या स्वरयंत्रामधून एंडोट्रॅकियल टय़ूब घातलेली असल्याने त्याला/तिला बोलता येत नाही. या कारणास्तव तुमचा रुग्ण तुमच्याशी बोलू शकत नसला तरीही त्यांना दिसत असते, ऐकू येत असते व तुम्ही बोललेले समजतही असते.
आजारातून बरे होण्याच्या मार्गावर असलेले रुग्ण आपले म्हणणे कागदावर लिहून दाखवून संवाद साधू शकतात. हातवारे, हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी सॉफ्टवेअर किंवा ‘व्होकलायझर’सारखी आयपॅड आधारित अॅप्लिकेशन्स यांचाही वापर ते करू शकतात.
रुग्णाची तब्येत सुधारू लागल्यावर त्याचे व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व हळूहळू कमी केले जाते. या प्रक्रियेला व्हेंटिलेटरपासून विलगन – ‘विनिंग फ्रॉम द व्हेंटिलेटर’ असे म्हटले जाते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com