Smallest Snake:- जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती असून प्रत्येक प्रजातींचे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. जगभरामध्ये सुमारे 3000 प्रजाती सापांच्या असून त्यामध्ये बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी असून काही जाती या विषारी आहेत. एवढेच नाही तर या जातींमधून काही प्रजाती या खूप मोठ्या आकाराच्या व काही प्रजाती या खूप लहान आकाराच्या आहेत.
साप म्हटले म्हणजे आपल्या समोर सगळ्यात अगोदर येते म्हणजे जर सापाने चावा घेतला तर मनुष्याचा मृत्यू होतो. परंतु हे फक्त विषारी सापांच्या बाबतीतच घडू शकते. याशिवाय सापांच्या अनेक महत्त्वपूर्ण अशा मनोरंजक फॅक्ट देखील आहेत. जर आपण पाहिले तर सापांचे जग हे खूप विविधतेने नटलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आता सापांच्या या सगळ्या प्रजातींमध्ये काही जाती इतक्या छोट्या आकाराच्या आहेत की तुम्ही शर्टच्या खिशामध्ये देखील दहा ते पंधरा साप आरामात ठेवू शकतात. त्यामुळे या लेखांमध्ये आपण नेमक्या सापांच्या सर्वात लहान प्रजाती कोणत्या आहेत याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
या आहेत जगातील सर्वात लहान सापांच्या प्रजाती
1- बार्बाडोस थ्रेडस्नेक– ही जगातील सर्वात लहान सापाची प्रजात असून या प्रजातीच्या सापाची लांबी फक्त 3.94 ते 4.9 इंचापर्यंत असते. या जातीचे साप प्रामुख्याने बार्बाडोसच्या कॅरिबियन बेटांवर आढळून येतात. त्या ठिकाणी ते पानांचा कचरा आणि खडकांच्या खाली राहतात. या प्रजातीचा साप प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी यांना मोठ्या प्रमाणावर खातो.
2- ब्राह्मणी साप– हा देखील एक लहान आकाराचा साप असून याची जास्तीत जास्त लांबी सहा इंचापर्यंत आहे. या प्रजातीचा साप प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सह जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उपोषण कटिबंधीय प्रदेशामध्ये आढळतो. हा साप प्रामुख्याने वाळवी व वाळवीची अंडी खातो.
3- व्हेरिगेटेड स्नेल इटर– या प्रजातीचा साप हा मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळून येणार आहे छोट्या आकाराचा साप आहे. याची जास्तीत जास्त लांबी पाच इंच असून तो विविध प्रकारच्या बिळामध्ये राहतो. हा साप प्रामुख्याने गोगलगायी मोठ्या प्रमाणावर खातो. गोगल गाईंचे जे काही कवच असते त्याला छिद्र पाडण्याकरिता तो त्याच्या लांब आणि पातळ थुंकीचा वापर करत असतो.
4- थ्रेड स्नेक– हा साप युरोप आणि आशिया मध्ये आढळणारा एक छोटा आकाराचा साप असून त्याची कमाल लांबी चार इंचापर्यंत असते. हा साप प्रामुख्याने पानांच्या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो व तो मोठ्या प्रमाणावर मुंग्या आणि वाळवी खातो.
5- फ्लॅट हेडेड स्नेक– हा एक चपट्या डोक्याचा साप असून तो ऑस्ट्रेलियामध्ये प्रमुख्याने आढळून येतो. या प्रजातीच्या सापाची लांबी चार इंचापर्यंत असते व बिळामध्ये वास्तव्य करतो. वालुकामय मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर हा आढळून येतो. हा साप मुंग्या आणि दिमक मोठ्या प्रमाणावर खातो.