Animal Husbandry:- भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये गाई व म्हशींचे पालन हे दुधाच्या उत्पादनाकरिता केले जात असते. कारण गाई किंवा म्हशीचे पालन हे प्रामुख्याने दुधाच्या उत्पादनाकरिता होतो व दुधाचे उत्पादनच या व्यवसायामधील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्याकारणाने जातिवंत आणि जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हशींचे पालन करणे यामध्ये गरजेचे असते.
तरच तुम्हाला या माध्यमातून चांगल्या प्रमाणात आर्थिक नफा मिळू शकतो. भारतामध्ये जास्तीच्या दूध उत्पादनाकरिता म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे चांगली आणि जास्त दूध देणाऱ्या प्रजातीचे पालन करणे हे आर्थिक नफा जास्त मिळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. म्हशींच्या दृष्टिकोनातून पाहिले तर म्हशींच्या अनेक प्रजाती आहेत. परंतु त्यातील जर आपण मुर्रा या जातीचे म्हैस पाहिली तर ती दूध उत्पादनाकरिता महत्त्वाची आणि फायदेशीर अशी प्रजात आहे.
दूध उत्पादनासाठी मुऱ्हा म्हैस आहे फायद्याची
भारतामध्ये ज्या काही म्हशींच्या प्रजाती आहेत त्यापैकी मुरा ही एक सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून ओळखली जाते. या जातीची म्हैस दिवसाला 25 ते 30 लिटर सरासरी इतके दूध देते. भारताच्या उत्तर भागामध्ये ही म्हैस मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. या म्हशीच्या दुधामध्ये फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते
व हिचे दूध प्यायल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम तसेच प्रोटीन आणि फॅट मिळतात. मुरा जातीच्या म्हशीच्या दुधाचा उपयोग हा तूप, दही तसेच ताक आणि लोणी यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
जर तुम्हाला मुर्रा जातीची म्हैस खरेदी करायची असेल तर तुम्हाला ती 50 हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत मिळते. दिवसातून ती सरासरी 25 लिटर दूध देते व या माध्यमातून तुम्ही दररोज एक हजार ते पंधराशे रुपये ची कमाई करू शकतात.
मुर्रा म्हशीसोबत या जातीच्या म्हशी देखील देतात जास्त दूध
मुर्रा म्हशीसोबत जर आपण इतर जातीच्या म्हशीचा विचार केला तर मेहसाणा जातीची म्हैस देखील एका दिवसामध्ये 20 ते 30 लिटर दूध देते. ही म्हैस मुख्यतः गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळते. महाराष्ट्र मध्ये आढळणारी पंढरपुरी जातीची म्हैस देखील चांगल्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे व त्यासोबतच सुरती या जातीची म्हैस देखील चांगल्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भारतात या ठिकाणी केले जाते मुऱ्हा जातीच्या म्हशीचे पालन
जर आपण भारताचा विचार केला तर हरियाणा, दिल्ली, पंजाब राज्यातील रोहतक, हीसार, कर्नाल इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुऱ्हा जातीच्या म्हशी आपल्याला आढळून येतात. भारता व्यतिरिक्त इटली आणि बल्गेरिया व इजिप्त या देशांमध्ये देखील मुर्रा जातीच्या म्हशी पाळल्या जातात. हरियाणा सारख्या राज्यांमध्ये या जातीच्या म्हशीला काला सोना म्हणून देखील ओळखले जाते.