Paytm Payment Bank:- पेटीएम पेमेंट बँकवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने कारवाई केल्यानंतर आता पेटीएम विरुद्ध आरबीआयने जे काही आदेश दिलेले आहेत. त्या आदेशांचा विचार केला तर त्यानुसार आता 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम पेमेंट बँक खात्यामध्ये पैसे जमा करता येणार नाहीत.
एवढेच नाही तर या बँकेच्या माध्यमातून प्रीपेड तसेच वॉलेट सेवा, फास्टटॅग आणि इतर सेवामध्ये पैसा जमा करता येणार नाही. परंतु व्याज तसेच कॅशबॅक आणि परतावा कधीही खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच बचत तसेच चालू खाते,
प्रीपेड साधने तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मध्ये पैसे काढणे किंवा वापरणे यावर निर्बंध नाहीत. परंतु शिल्लक उपलब्ध होईपर्यंत ते वापरता येणार आहेत. परंतु वरील सेवा वगळता पेटीएम पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणतीही बँकिंग सेवा प्रदान करण्याची परवानगी नाही.
परंतु पेटीएम पेमेंट बँक वापरणाऱ्या असंख्य ग्राहकांना आता प्रश्न पडला असेल की 29 फेब्रुवारी नंतर काय? त्यामुळे डिजिटल पेमेंटचा नवीन पर्याय शोधण्याची वेळ आता बऱ्याच जणांवर आली असेल.
याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण उत्तम अशा काही डिजिटल पेमेंट पर्यायांची माहिती घेणार आहोत जे तुम्हाला विना कटकट व्यवहारांपासून ते चांगल्या बँकींग सुविधांसह तुमच्या गरजा पूर्ण करू शकतात.
हे आहेत पेटीएमला चांगले पर्याय
1- मोबिक्विक- अत्याधुनिक इनस्क्रिप्शन सुविधा आणि सर्वोच्च दर्जाची सुरक्षितता या आधारे मोबिक्विक वापरकर्त्याला सुरक्षित व्यवहाराची मुभा देते. या माध्यमातून तुम्हाला वॉलेट्सह अनेक डिजिटल वित्तीय सोल्युशनचा सर्वसमावेशक सेवा मोबिक्वीक देऊ करते.
त्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज तसेच बिले भरणे आणि ऑनलाईन खरेदी अशा व्यवहार करू शकतात. या माध्यमातून तुम्ही दोन बँक खात्यातील हस्तांतर व्यवहार देखील करू शकतात. एवढेच नाही तर झिप पे लेटरच्या माध्यमातून मोबीक्विक ग्राहकांना आधी खरेदी करून नंतर पैसे देण्याची सुविधा देखील देते.
त्यामुळे ग्राहकांना मुक्तपणे खरेदी करता येते. तसेच या माध्यमातून झिप ईएमआय सुविधा देखील पुरवते. या माध्यमातून पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना दहा हजार ते दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते आणि त्यासाठी तीन ते 24 महिन्यांची मुदतीत ईएमआय पर्याय मिळतो.
2- ॲमेझॉन पे- अमेझॉन पे च्या माध्यमातून देखील अखंडित व्यवहारांकरिता अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या माध्यमातून ग्राहकांना बिले भरण्यापासून ते मोबाईल फोन रिचार्ज करता येणे शक्य आहे.
तसेच ॲमेझॉन वॉलेट पेमेंट पद्धत ही सुरक्षितपणे व्यवहार करण्यासाठी सोयीस्कर मार्ग देते. ॲमेझॉन पे च्या माध्यमातून देखील ग्राहक निश्चितपणे व्यवहार करू शकतात.
3- गुगल पे- युजर्सला सुरक्षितपणे पैसे पाठवण्याची, इलेक्ट्रिसिटी बिल भरणे तसेच ऑनलाईन खरेदी करण्याची मुभा गुगल पे च्या माध्यमातून दिली जाते व गुगल पेने डिजिटल व्यवहार सुलभ केलेले आहेत.
गुगल पे वॉलेटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सेवा तुम्हाला दैनंदिन आवश्यक गोष्टी सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पडते. गुगलच्या सुरक्षित उपाय आणि बांधिलकीच्या जोरावर जगभरातील कोट्यावधी वापरकर्त्यांना अखंडित व खात्रीशीर पेमेंटचा अनुभव देते.
4- जिओ पेमेंट बँक– जिओ पेमेंट बँक आपल्या युजर फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बँकिंग व पेमेंट सोल्युशनची वैशिष्ट्यपूर्ण मालिका देऊ करते. ज्या काही पारंपारिक बँकिंग सुविधा आहेत त्या सुविधा तर जिओ पेमेंट बँकच्या माध्यमातून दिले जातातच. परंतु जिओ वॉलेटच्या सोयीस्कर सुविधांचा लाभ घेऊन देखील सुरक्षित स्वरूपात व्यवहार करता येतो. जिओ पेमेंट बँक देशभरातील युजर्सना चांगल्या प्रकारे वित्त व्यवस्थापनाची मुभा देते.
5- फोन पे- भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फोन पे चा वापर ग्राहक करतात. पैशांचे हस्तांतरण तसेच मोबाईल फोन रिचार्ज सारख्या अनेक सेवा फोन पे च्या माध्यमातून देऊ केल्या गेल्या आहेत. यूजर फ्रेंडली इंटरफेस आणि व्यापाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून फोन पे देशभरातील कोट्यावधी वापरकर्त्यांसाठी अनेक दैनंदिन व्यवहार सुलभ करून देते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विश्वासू बँकिंग पार्टनर असे पाठबळ असलेली फोन पे ची सेवा खात्रीशीर आणि विश्वसनीय अशी आहे. त्यामुळे डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रामध्ये हा एक ग्राहकांसाठी पसंतीचा पर्याय आहे.