Mutual Fund Scheme:- गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करत असताना त्यापासून मिळणारा परतावा आणि व्याज याचा विचार करतात तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याला मोठ्या प्रमाणावर सध्या प्राधान्य देताना दिसून येतात.
कारण म्युच्युअल फंड ही गुंतवणूकदारांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त पर्याय असल्याचे सध्या दिसून येत आहे. यामध्ये तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला माहीत असेल व हे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या हातात किती वेळ आहे?
तुम्ही किती जोखीम स्वीकारू शकतात? म्युच्युअल फंडाच्या अशा काही योजना आहेत की त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंडाच्या अशा तीन योजनांबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर दहाच वर्षात गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्तीचा परतावा मिळाला आहे.
या आहेत म्युच्युअल फंडाच्या अधिक परतावा देणाऱ्या योजना
1- निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड- म्युच्युअल फंडाच्या या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
या योजनेमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आणि अनुभवी व्यवस्थापन संघ आहे. या योजनेने गुंतवणूकदारांना दहा वर्षात १२०५.२९% परतावा दिला आहे.
2- एसबीआय स्मॉल कॅप फंड- थेट योजना- वाढ- ही योजना एसबीआय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून व्यवस्थापित केली जाते. म्युच्युअल फंडाची ही योजना उच्च वाढीची क्षमता असलेल्या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
बाजारातील चढ उतार असूनही एसबीआय स्मॉल कॅप फंडाने दहा वर्षात गुंतवणूकदारांना ११०८.१२ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
3- काँट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड- म्युच्युअल फंडाच्या या योजनेचे मॅनेजमेंट ची जबाबदारी अंकित पांडे यांच्यावर असून हा इक्विटी फंड दीर्घकालीन वाढीचे टार्गेट ठेवून कर बचत फायदे देतो.
म्युच्युअल फंडाच्या या योजनेने गेल्या दहा वर्षात गुंतवणूकदारांना १०२०.८५ टक्के परतावा दिला आहे. ही योजना इक्विटी एक्सपोजरसह कर कार्यक्षम गुंतवणुकीच्या महत्त्वावर भर देते.