Agri Business Idea: पडीक  जमिनीवर ‘या’ फुलाची लागवड करून खर्चाच्या 6 पट मिळेल उत्पन्न! बाजारात असते भरपूर मागणी

Ajay Patil
Published:
camomile flower

Agri Business Idea:- शेती आणि शेती क्षेत्राचा विकास आता झपाट्याने होत असून तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आता वाढताना दिसून येत आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या वापराने कमीत कमी क्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यामध्ये शेतकरी आता यशस्वी होत आहे.

पारंपरिक पिकांना फाटा देत विविध फुल पिकांपासून तर भाजीपाला पिके तसेच  फळबागांची लागवड करून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर या ठिकाणचे शेतकरी कॅमोमाइल फ्लॉवर म्हणून ओळखले जाणाऱ्या फुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.

जर आपण या फुलाचे महत्त्व पाहिले तर त्याचे महत्त्व आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून या फुलापासून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे बनवली जातात. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या  माध्यमातून या फुलाला चांगली मागणी असते. याविषयीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 कॅमोमाईल फुलाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्व

 या फुलाला जादुई फुल असे देखील म्हटले जाते व यामध्ये काही महत्त्वाचे घटक असतात व ते पोटाशी संबंधित आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतात. एवढेच नाहीतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये या फुलाची मागणी जास्त असल्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील आता या फुलाच्या लागवडीमध्ये वाढ झालेली आहे.

 पडीत जमिनीवर देखील मिळू शकते भरपूर उत्पन्न

 महत्वाचे म्हणजे अगदी पडीक जमिनीवर देखील या फुलाचे बंपर उत्पादन मिळते. या फुलाच्या लागवडीतून शेतकरी स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. आपण या फुलाचे उत्पादन पाहिले तर साधारणपणे एक एकर जमिनीमध्ये पाच क्विंटल उत्पादन मिळते व हेक्‍टरी 12 क्विंटल पर्यंत फुलांचे उत्पादन होते.

त्याचा लागवड खर्च दहा हजार ते बारा हजार रुपये इतका येतो. परंतु खर्चाचा मानाने तुम्ही या फुलांपासून पाच ते सहा पट नफा जास्त मिळवू शकतात.

ही फुले सहा महिन्यात काढणीस तयार होतात. म्हणजेच शेतकऱ्यांना सहा महिन्यांमध्ये हातात पैसा यायला सुरुवात होते व या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन शेतकरी मिळवू शकतात.

 कॅमोमाईल फुलाचे इतर महत्त्वाचे गुणधर्म

 या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले वाळल्यानंतर यांचा चहा बनवून पिला जातो. या फुलांच्या चहामुळे अल्सर आणि मधुमेहासारखे आजारांपासून आराम मिळतो.

तसेच त्वचेच्या आजारांवर देखील हे फुल खूप फायद्याचे ठरते. हे फुल निद्रानाश तसेच चिडचिडेपणा वर देखील रामबाण ठरते. एवढेच नाही तर या फुलाचा उपयोग जखमा आणि पोटाचे आजार बरे करण्यासाठी देखील केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe