Pm Surya Ghar Scheme:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली व या माध्यमातून संपूर्ण देशात जवळपास एक कोटी घरांमध्ये ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर ऊर्जा वीज निर्मिती संच बसवून त्या माध्यमातून विजेची गरज पूर्ण केली जाणार आहे.
यामध्ये घराला जितकी वीज लागेल तेवढी विजेचा वापर झाल्यानंतर निर्माण झालेली जास्तीची वीज महावितरण विकत घेणार आहे. या योजनेत कुटुंब तसेच संस्था पात्र ठरणार असून एक किलो वॅटकरिता आठ ते दहा चौरस मीटर जागेची गरज भासणार आहे. या माध्यमातून बसवण्यात येणारा सौर ऊर्जा संच पंचवीस वर्षे चालतो.
महत्वाचे म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरात किंवा रिकाम्या जागेवर देखील सौर ऊर्जा संच बसवू शकतात व त्याला स्थलांतरित देखील केले जाऊ शकते. स्वच्छ सूर्यप्रकाश राहिला तर तुम्ही एका दिवसामध्ये पाच युनिट वीज निर्मिती या माध्यमातून करू शकतात. अशाप्रकारे ही खूप महत्वपूर्ण अशी योजना आहे.
पोस्टमन आणि डाकसेवक यांच्याकडे सर्वेक्षणाचे काम
केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्य घर योजनेची माहिती आणि योग्य लाभार्थ्यांची निवड व्हावी याकरिता आता टपाल खात्याची निवड करण्यात आली असून त्याकरिता पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांना प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करायचे आहे. याव्यतिरिक्त पीएम सूर्य घर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील इच्छुक लाभार्थ्यांना नोंदणी करता येणार आहोत.
यामध्ये ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना मोबाईल दिलेले असून ऑनलाईन एप्लीकेशनच्या माध्यमातून ते नोंदणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे खूप गरजेचे आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या योजनेस पात्र असलेले परिवारांचा शोध घेतला जाणार आहे.
जेणेकरून कोणीही यापासून वंचित राहू नये हा सरकारचा उद्देश आहे. यामध्ये सर्वेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड केली जाईल व त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या घरावर सोलर प्लांट इन्स्टॉल केला जाणार आहे. तसेच पोस्टमन नोंदणी करतील असे नाही तर या योजनेची संपूर्ण माहिती कुटुंबाना देण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत सोलर प्लांट वर मिळत आहे अनुदान
पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबाकरिता दोन किलो वॅट पर्यंत प्रति किलोवॉट 30 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जे कुटुंब तीन किलो वॅट पर्यंतची क्षमता असणारी यंत्रणा बसवेल अशा कुटुंबाला प्रति किलोवॅट 18000 हजार रुपयांचे अनुदान व जास्तीत जास्त 78 हजारांचे अनुदान मिळणार आहे.