Widow Pension Scheme: विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला मिळेल निवृत्तीवेतन! राज्य सरकारची विशेष योजना करेल मदत, वाचा कसा घ्याल लाभ?

Ajay Patil
Published:
widow pension scheme

Widow Pension Scheme:- समाजातील विविध घटकांकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून यामध्ये आर्थिक दुर्बल घटक तसेच वृद्ध निराधार व्यक्ती, दिव्यांग बंधू, विधवा महिला अशा घटकांकरिता या योजना असून यातून आर्थिक मदत लाभार्थ्यांना करण्यात येते.

यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना यासारख्या योजनांचा उल्लेख यामध्ये करता येईल. एकल महिला तसेच आजारी व्यक्ती,

दिव्यांग बांधव तसेच वयोवृद्ध व्यक्ती या योजनांचे लाभार्थी आहे. परंतु यासोबतच विधवा महिलांकरिता राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला निवृत्तीवेतन जमा केले जाते.या योजनेचे नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना होय. याची योजनेची माहिती या लेखात घेऊ.

 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विधवा महिलांना दरमहा निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा केले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व प्रवर्गातील विधवा महिलांसाठी लागू असलेली योजना आहे.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या किमान 40 ते कमाल 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून निवृत्ती  वेतन अर्थात पेन्शन मिळण्यास पात्र असतात.

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना केंद्र शासनाकडून प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये आणि राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून चारशे रुपये असे मिळून प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय/ तुमच्या तालुक्याचे तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करता येणे शक्य आहे. या योजनेसाठी संपर्क करायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना / तलाठी यांच्याकडे संपर्क करता येऊ शकतो.

 अशा पद्धतीने करता येईल ऑनलाइन अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी महिला ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता तो याकरिता https://aaplesarkar.maharashtra.gov.in या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकता. जेव्हा ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून अर्ज दाखल केला जाईल त्यानंतर दोन महिन्याच्या आत तलाठीच्या माध्यमातून लाभार्थ्याकडून आलेल्या अर्जावर चौकशी केली जाते

व कागदपत्रांची छाननी करून सविस्तर अहवाल सादर केला जातो. त्यानंतर मीटिंगमध्ये मंजुरीसाठी असे अर्ज पाठवले जातात. मीटिंगमध्ये आलेले अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्यावर त्यासंबंधीची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातूनच कळवली जाते.

त्यानंतर लाभार्थ्याची ओळख पटवली जाते व रजिस्टरमध्ये नोंद घेऊन जे लाभार्थी  महिला पात्र असतील त्यांची बिले प्रत्येक महिन्याला कोषागारमध्ये सादर केले जातात व योजनेच्या स्वरूपप्रमाणे बँक याद्या तयार करून लाभार्थ्याच्या बँक खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले जातात.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरिता अर्जदाराकडे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित प्रमाणपत्र व त्यासंबंधीच्या ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडील दाखला,

पतीचे निधन झाल्याबाबतचा दाखला( ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडील मृत्यूचा दाखला),स्वयंघोषणापत्र आणि शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe