Gold Loan Update: 2 वर्षाच्या कालावधीकरिता 5 लाख रुपये गोल्ड लोनवर किती भरावा लागेल ईएमआय! कोणत्या बँकेचे किती आहेत व्याजदर?

Ajay Patil
Published:
gold loan

Gold Loan Update:- जेव्हा एखादी अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती निर्माण तेव्हा मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये आपल्याकडे पुरेसा पैसा असतो असे नाही.

त्यामुळे साहजिकच आपण बँकांच्या माध्यमातून कर्जासाठी प्रयत्न करत असतो. त्यातल्या त्यात बँकेकडून ताबडतोब कर्ज मिळावे याकरिता बरेच व्यक्ती सोनेतारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोनचा आधार घेतात. यामध्ये आपल्याकडे जे काही सोने असते ते बँकेकडे तारण ठेवून आपल्याला बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळत असते.

परंतु कर्ज कुठलेही घेतले तरी आपल्याला त्यावर व्याजदर आकारला जातो व या व्याजदराचा प्रभाव हा आपल्या कर्ज परतफेडीवर होतो. त्यामुळे आपण स्वस्त व्याजदरामध्ये कुठे कर्ज मिळेल?

त्याचा शोध घेऊनच कर्ज घेतो. त्यामुळे या अनुषंगाने आपण या लेखात जर तुम्हाला सोने गहाण ठेवायचे असेल किंवा गोल्ड लोन किंवा सोने तारण  कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या बँकेकडून तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते? याबद्दलची माहिती घेऊ.

 या बँकात देत आहेत कमी व्याजदरात सोने कर्ज

1- इंडियन बँक इंडियन बँकेच्या माध्यमातून दोन वर्षाकरिता पाच लाख रुपयांचे सोने तारण कर्जावर साधारणपणे 8.65% इतका व्याजदर आकारला जात असून त्यासाठी तुम्हाला 22 हजार 599 रुपये इतका मासिक हप्ता देणे गरजेचे आहे.

2- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही दोन वर्षाकरिता पाच लाख रुपयांचे सोने कर्ज घेतले तर त्यावर बँकेकडून 8.5 टक्के इतका व्याजदर आकारला जात आहे व त्याचा मासिक ईएमआय साधारणपणे 22,568 रुपये असेल.

3- बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया ही बँक दोन वर्षाच्या कालावधीकरिता जर तुम्ही पाच लाख रुपये गोल्ड लोन घेतले तर त्यावर 8.8 टक्के इतका व्याजदर आकारत असून त्याचा ईएमआय हा 22 हजार 631 रुपये भरावा लागेल.

4- युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्वात स्वस्त गोल्डन लोन दिले जात असून त्यासाठीचा व्याजदर हा 8.7% इतका आहे. युनियन बँक ऑफ इंडिया कडून जर तुम्ही दोन वर्षाच्या कालावधी करिता पाच लाख रुपये गोल्ड लोन घेतले तर त्याचा ईएमआय 22 हजार 610 रुपये इतका असेल.

5- बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा कडून जर तुम्ही गोल्ड लोन घेतले तर त्यावर 9.4% इतके व्याज आकारले जात असून दोन वर्षाच्या कालावधी करिता जर तुम्ही पाच लाख रुपये लोन घेतले तर तुम्हाला 22 हजार 756 रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.

6- कॅनरा बँक आणि पीएनबी बँक पंजाब नॅशनल बँक व कॅनरा बँकेच्या माध्यमातून दोन वर्षाच्या कालावधी करिता जर गोल्ड लोन घेतले तर 9.25 टक्के व्याजदर आकारला जात असून पाच लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 22 हजार 725 रुपये ईएमआय भरावा लागेल.

7- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही दोन वर्षाच्या कालावधीकरिता पाच लाख रुपये गोल्ड लोन घेतले तर त्यावर बँकेकडून 9.6% व्याज आकारले जात आहे व त्याचा मासिक हप्ता हा 22 हजार 798 रुपये इतका असेल.

8- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून जर दोन वर्षाच्या कालावधी करिता पाच लाख रुपये गोल्ड लोन घेतले तर बँकेकडून दहा टक्के इतका व्याजदर आकारला जात असून याकरिता तुम्हाला 22882 रुपयांचा ईएमआय भरणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe