लोकांना ग्रासतेय कोरोनाची नव्हे तर ‘ही’भीती

Ahmednagarlive24
Published:

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले. जवळपास १८३ देशांनी यामुळे लॉक डाऊन केले. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे.

त्यामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोकांची कोरोनासाठी मनाची तयारी झाली आहे. मात्र लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त भीती वाटत असल्याचे ‘IIM लखनऊ’ने केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे.

Understanding public sentiment during lockdown या विषयावर हा ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात 79 टक्के लोकांना भविष्याविषयी सर्वात जास्त चिंता वाटत असल्याचं स्पष्ट झालंय.

40 टक्के लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. तर 22 टक्के लोक दु:खी आहेत. या सर्व्हेत 23 राज्यांतल्या 104 शहरांमधल्या लोकांनी सहभाग घेतला होता.

मंदीतली अर्थव्यवस्था, डोक्यावरचा कर्जाचा बोजा यांचं काय होणार, आरोग्यावरचा खर्च वाढणार आहे, लोकांचा व्यवहार कसा बदलेल याची लोकांना आता चिंता लागलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment