फायनान्सच्या कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील तरुणाने श्रीरामपूर-वाकडी रस्त्यालगत धनगरवाडीफाटा येथील बसथांब्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेतला.

खासगी फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुका ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे व कॉन्स्टेबल कराळे यांनी पंचनामा केला.

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या शर्टच्या खिशात आधारकार्ड व चिठ्ठी सापडली. एका खासगी फायनान्स कंपनीच्या सततच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले आहे.

या तरुणाच्या आधारकार्डवर संतोष घनश्याम पालकर (वय ३८, घरकुल, गोंधवणी, ता. श्रीरामपूर) असे नाव व पत्ता असल्याने ओळख पटली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment