तुम्ही गृहकर्ज किंवा वाहनकर्ज घेतले आहे का? रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतला ‘हा’ निर्णय! वाचा तुमचा कर्जाचा हप्ता वाढेल की जैसे थे राहील?

Published on -

अनेक बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ केल्यामुळे गृहकर्ज तसेच वाहनकर्ज घेणे सोपे झाले आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती आता घराचे किंवा स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज किंवा वाहनकर्ज घेत असतात.

कर्ज घेतले म्हणजे आपल्याला मासिक स्वरूपामध्ये त्याचे हप्ते भरणे गरजेचे असते. परंतु या सगळ्या आर्थिक गोष्टींवर किंवा आर्थिक बाबींवर रिझर्व बँकेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांचा परिणाम होत असतो. रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून जेव्हा रेपोदराच्या बाबतीत काही निर्णय घेतला जातो.

व त्याचा परिणाम हा घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांवर होत असतो. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून रेपो दर वाढवणे किंवा जसे थे ठेवणे किंवा कमी करणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांवर होतो. अगदी याच पद्धतीने आता केंद्रीय रिझर्व बॅंकेचे हा चलन विषयक धोरण समितीची बैठक पार पडली व याबाबत रेपो दराविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

 रिझर्व बँकेने पुन्हा रेपो दर ठेवला 6.5 टक्क्यांवर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली व त्यामध्ये घेतलेले निर्णय जाहीर करण्यात आले व त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे रिझर्व बॅंकेने पुन्हा एकदा रेपोदर हे 6.5% वरच ठेवले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली.

रेपोदर 6.5 टक्क्यांवरच ठेवल्यामुळे आता ज्या व्यक्तींना व्याजदरामध्ये कपात होईल अशी अपेक्षा होती त्यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने  जे लोक वाहन किंवा गृहकर्जाचे हप्ते भरत आहेत त्यांना मात्र दिलासा मिळण्यास मदत झालेली आहे.

कारण वाहन किंवा गृह कर्जाचे जे काही हप्ते आहेत त्यामध्ये आता वाढ होणार नाही. याबाबत बोलताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले की, महागाईमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होत असून रिझर्व बँकेने जेव्हा कोविड कालावधी होता तेव्हा म्हणजेच मे 2020 मध्ये रेपो दरात 40 बेसिस पॉइंटने कपात केली होती व तो चार टक्क्यांवर आणला होता.

कारण तेव्हा कोविड महामारीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला होता व त्यामुळे मागणी मंदावलेली होती व उत्पादनात कपात झाली आणि नोकऱ्या देखील कमी झाल्या. परंतु तेव्हापासून मात्र जे काही उच्च चलन वाढ झाली त्याचा सामना करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपोदरात 250 अंकांनी म्हणजे 6.50 टक्क्यांनी वाढ केलेली आहे.

 रिपो रेट किंवा रेपो दर म्हणजे काय?

रिझर्व बँकेच्या माध्यमातून व्यापारी बँकांना जे काही आपत्कालीन कर्ज दिले जाते व त्या कर्जावर रिझर्व बँकेच्या माध्यमातून ज्या व्याज दराने व्याज आकारले जाते त्या दराला रेपो दर असे म्हणतात. म्हणजेच या व्यवहारांतर्गत कुठल्याही वस्तूची विक्री केली असता काही ठराविक कालावधीनंतर ती वस्तू परत आधीच ठरलेल्या दराने पुनर खरेदी करण्याचे आश्वासन दिले जाते.

महत्वाचे म्हणजे रेपो दरालाच  खरेदीचा दर तसेच वटणावळीचा दर देखील म्हणतात. रेपो दराने बँकांना जे काही कर्ज उपलब्ध होते ते अल्पमुदतीचे असते व त्यामुळे या दराचे परिणाम इतर बँका त्यांच्या ग्राहकांना जे अल्पकालीन कर्ज देतात त्यांच्यावर होतो.

साधारणपणे जुलै 2023 पासून रेपोदर हा 6.50% इतकाच राहिलेला आहे. त्यामुळे आता देखील हा दर तितकाच ठेवण्यात आल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या हप्ते वाढणार नाहीत व त्यामुळे नक्कीच जे व्यक्ती हप्ते भरत आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe