श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना नाद करायचा नाय ! चार एकर डाळिंबातून घेतले 51 लाखांचे उत्पन्न

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या हंगेवाडी या गावचे रायकर कुटुंब तसे पाहायला गेले तर शेतकरी कुटुंब आहे. त्यांची वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे परंतु या चार एकर जमिनीवर रायकर कुटुंब हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक पिकांची लागवड करत होते. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जितके पिकांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळायला हवे तितके मात्र मिळत नसल्याने शेतीमध्ये काहीतरी वेगळे करावे असा विचार त्यांच्या मनामध्ये होता.तसेच हंगेवाडी व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवल्याचे ते पाहत होते व त्यांनी देखील आता डाळिंब लागवड करावी असा निर्णय घेतला व धाडस करून चार एकर क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड करण्याचे ठरवले.

Updated on -

Shrigonda Farming News : गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच वादळी वारे व गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याकारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची स्थिती आहे. तसेच हवामान बदलाचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर आपल्याला पाहायला मिळतो.

परंतु या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीवर मात करण्याकरिता अनेक शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेतीला फाटा देत भाजीपाला व फळबागांच्या लागवडीकडे वळले आहेत व त्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पादन घेऊन लाखात नफा मिळवण्यात देखील यशस्वी झाल्याचे आपण पाहतो.

अगदी याच पद्धतीने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या हंगेवाडी येथील संतोष रायकर यांची यशोगाथा पाहिली तर ती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीमधून शेती परवडत नाही  असे म्हणणाऱ्या इतर शेतकऱ्यांसमोर त्यांनी डाळिंब शेतीच्या माध्यमातून मोठा आदर्श निर्माण केला आहे.

 संतोष रायकर यांनी डाळिंब शेतीतून साधली आर्थिक प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या हंगेवाडी या गावचे रायकर कुटुंब तसे पाहायला गेले तर शेतकरी कुटुंब आहे. त्यांची वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे.

परंतु या चार एकर जमिनीवर रायकर कुटुंब हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक पिकांची लागवड करत होते. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जितके पिकांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळायला हवे तितके मात्र मिळत नसल्याने शेतीमध्ये काहीतरी वेगळे करावे असा विचार त्यांच्या मनामध्ये होता.

तसेच हंगेवाडी व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवल्याचे ते पाहत होते व त्यांनी देखील आता डाळिंब लागवड करावी असा निर्णय घेतला व धाडस करून चार एकर क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड करण्याचे ठरवले.

विशेष म्हणजे त्यांनी योग्य व्यवस्थापन ठेवून दर्जेदार अशा डाळिंबाचे उत्पादन घेतले व त्यांना या चार एकरमधून तब्बल 51 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

डाळिंब उत्पन्नातून स्वतःच्या घराचे स्वप्न केले पूर्ण

ज्याप्रमाणे स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अगदी त्याच प्रकारे स्वतःच्या घराचे स्वप्न संतोष रायकर यांचे देखील होते. हे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डाळिंबाने  खूप मोठी मदत केली व डाळिंबातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले

व एवढेच नाही तर डाळिंब शेतीतून चांगली आर्थिक प्रगती झाली म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांनी घरावर डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती देखील साकारली. सध्या संतोष रायकर यांच्या डाळिंब शेतीची व त्यांनी बांधलेले या घराची पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा असून हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे.

तसेच संतोष रायकर यांच्या डाळिंब शेतीच्या माध्यमातून पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक पद्धतीची शेती व डाळिंब शेती किती फायद्याची आहे हे देखील इतर शेतकऱ्यांना कळून आल्याने त्यांच्यासाठी देखील हे एक प्रेरणादायी ठरले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News