लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित पाहिजे असतील तर आजच करा बँकेचं हे ‘काम’

अनेक महिलांना योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कारण बऱ्याच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांशी लिंकच नसल्याने ही समस्या उद्भवलेली आहे.

Updated on -

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाची योजना असून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

म्हणजे यासाठीचा लाभ 14 ऑगस्ट पासून द्यायला सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा देखील व्हायला लागलेले आहेत. 17 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे.

परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक महिलांना योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कारण बऱ्याच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि त्यांचे बँक खाते एकमेकांशी लिंकच नसल्याने ही समस्या उद्भवलेली आहे.

त्यामुळे आपला आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही? हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणते बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे? हे देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणे खूप गरजेचे आहे.

 बँकेला आधार क्रमांक लिंक असणे आहे गरजेचे

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज दाखल करताना आपण जो काही अर्ज दाखल केलेला आहे व त्यामध्ये जो काही बँकेचा खाते क्रमांक दिलेला आहे तो आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे खूप महत्त्वाचे आहे. जर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही.

म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र असताना देखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची बँक सीडिंग स्टेटस जाणून घेणे व बँक खाते आधार क्रमांक लिंक करणे खूप गरजेचे आहे. त्याआधी तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही आणि आहे तर कोणत्या बँक खात्याशी आहे हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

 अशाप्रकारे चेक करा बँक खाते आधार क्रमांक लिंकचे स्टेटस

1- तुम्हाला जर बँक सीडींग स्टेटस तपासायचे असेल तर याकरता तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयच्या uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडावी लागेल.

3- भाषा निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या आधार सर्विसेस हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर पुढे आधार लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल.

4- आधार लिंकिंग स्टेटसवर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल व त्यावर बँक सीडींग स्टेटस हा पर्याय तुम्हाला दिसून येईल.

5- त्यानंतर या पर्यायावर क्लिक करावे व तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅपच्या कोड टाकून लॉगिन करावे.

6- त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल व हा ओटीपी नमूद केल्यानंतर तुमचे युआयडीएआयच्या वेबसाईटवर लॉगिन होईल.

7- यानंतर खाली बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते बँक खाते लिंक आहे हे तुम्हाला समजते.

जर कोणतेही खाते तुमचे आधार क्रमांकाची लिंक नसेल तर ते लिंक करून घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!