Credit Card Rule:- क्रेडिट कार्डचा वापर सध्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे व मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्ड युजर्सची संख्या आपल्या देशात आहे. आपल्याला माहित आहे की प्रत्येक बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सध्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड ऑफर केले जाते. क्रेडिट कार्डचा वापर हा तसे पाहायला गेले तर खूप फायदाच आहे.
त्याचे अनेक फायदे आपल्याला सांगता येतील. जेव्हा ही क्रेडिट कार्डचा वापर आपण करतो तेव्हा त्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या सवलती तसेच ऑफर आणि रिवार्ड पॉईंटच्या माध्यमातून देखील खूप मोठा फायदा होत असतो. तसेच एखाद्या वस्तूच्या खरेदीवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला कॅशबॅकचा देखील फायदा मिळतो.

त्यामुळे किराणा मालाच्या खरेदी पासून इतर अनेक प्रकारच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर खूप फायद्याचा आहे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला एटीएम मधून पैसे देखील काढता येतात व याला क्रेडिट कार्डचे कॅश ऍडव्हान्स फीचर्स असे म्हणतात.
बँकेच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येणाऱ्या क्रेडिट कार्डला जी कॅश लिमिट असते त्यानुसार आपण रोख स्वरूपात पैसे काढू शकतो. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे खरच फायद्याचे आहे का? हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
क्रेडिट कार्ड मधून रोख पैसे काढणे योग्य आहे का?
क्रेडिट कार्ड मधून रोख स्वरूपात पैसे काढणे हे आपल्याला अचानकपणे पैशांची गरज पडली तर त्यासाठी उपयुक्त आहे हा एक फायदा सोडला तर क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढणे याचे तोटे जास्त आहेत. क्रेडिट कार्डच्या सहाय्याने रोख रक्कम काढली तर त्यामुळे….
1- शुल्क व व्याजदर आकारला जातो– प्रत्येक वेळी जर क्रेडिट कार्ड वापरून रोख रक्कम काढली तर त्यावर शुल्क आकारले जाते. हे शुल्क व्यवहाराच्या रकमेच्या अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत असते. तसेच रोख पैसे काढण्यावरही व्यवहार शुल्क आकारले जाते.
2- लेट पेमेंट फी– समजा तुम्ही क्रेडिट कार्ड मधून रोख रक्कम काढली व त्या रकमेची पूर्ण परतफेड केली नाही तर थकबाकी असलेल्या रकमेवर विलंब शुल्क आकारले जाते व ते तब्बल 15 ते 30 टक्क्यांपर्यंत असू शकते.
3- सिबिल स्कोरवर होतो वाईट परिणाम– तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करून वारंवार पैसे काढत असाल तर त्याचा विपरीत परिणाम सिबिल स्कोर वर देखील होतो व तुमचा सिबिल स्कोर घसरू शकतो.
त्यामुळे क्रेडिट कार्ड वरून रोख रक्कम काढण्याअगोदर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे.