Financial Habits: जीवनात ‘या’ 5 सवयीच तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात! नाहीतर पैसे कमवून रहाल कंगाल

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल आणि जितके जास्त वेळ कराल तितके पैसे चक्रवाढच्या मदतीने वाढण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही सवयी लावून घेणे खूप गरजेचे राहते. त्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय पटकन पूर्ण करू शकतात.

Published on -

Financial Habits:- प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करून पैसे कमवत असतो. अनेक जण दिवस रात्र काबाडकष्ट करतात व मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत असतात. तसेच या कष्टातून कमावलेले पैसे वाचवून त्या पैशांची बचत करतात.

परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही पैसे वाचवले तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर याचे उत्तर जर बघितले तर तुम्ही कितीही पैसे कमावले व ते वाचवले तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. कारण परिस्थिती आणि काळानुसार जर बघितले तर पैशाचे मूल्य वाढत नाही तर ते सतत कमी होत जाते.

त्यामुळे तुम्हाला हे पैसे सतत गुंतवत राहणे गरजेचे राहते व गुंतवण्यातून हे पैसे वाढत राहतात. याकरिता पैसे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक गरजेचे राहील व  अशा गुंतवणुकीतून तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याजाचा फायदा मिळेल व पैसे देखील वेगात वाढत राहतील.

तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल आणि जितके जास्त वेळ कराल तितके पैसे चक्रवाढच्या मदतीने वाढण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही सवयी लावून घेणे खूप गरजेचे राहते. त्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय पटकन पूर्ण करू शकतात.

 या सवयी अंगी बाणवा आणि श्रीमंत व्हा

1- प्रथम आयुष्यात ध्येयाची निश्चिती करा सगळ्यात अगोदर तुम्हाला एखादे लक्ष सेट करणे गरजेचे राहते व त्या लक्षानुसार तुम्ही पैसे वाचवणे व ते पैसे वाढवणे तुम्हाला सोपे जाईल. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला एखादे ध्येय पूर्ण करायचे असेल तर ते तुम्हाला किती दिवसात पूर्ण करायचे आहे?

हे जेव्हा तुमचे निश्चित असेल तेव्हा तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कायम मोटिवेट म्हणजेच प्रेरित होत राहाल व त्यानुसार प्लॅनिंग करून पैसे वाचवून ते गुंतवून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा मिळवू शकतात. म्हणजेच असे ठरवलेले ध्येय  तुम्हाला प्रेरणा देईल व तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी व्यवस्थित पैसे वाढवण्यासाठी चे प्लॅनिंग करा.

2- बजेट तयार करा खर्चाचा मागोवा घ्या जर तुम्हाला पैसा वाढवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे वाचवणे आणि पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला बजेट बनवणे आवश्यक आहे. तुमचे मासिक बिले तसेच बाहेर खाण्याचा खर्च व भाडे व इतर सर्व गोष्टींसाठी लागणारा खर्च इत्यादींचे आगाऊ अंदाजपत्रक तयार करावे.

तुमच्या बजेटनुसार खर्च करण्याचा प्रयत्न करावा व तुमच्या खर्चाचा सतत अंदाज किंवा मागोवा घ्यावा. असं केल्याने तुमचा खर्च तुमच्या बचतीच्या पलीकडे तर जात नाही ना हे तुम्हाला समजते.

3- फक्त पैसे वाचवू नका तर त्या पैशांची गुंतवणूक करा तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही कष्टाने पैसे कमवत आहात व त्या पैशांची बचत करत आहात व तुम्ही श्रीमंत व्हाल तर असे कधीच होऊ शकत नाही. जसा काळ बदलत राहतो तसतसे पैशांचे मूल्य देखील कमी कमी होत जाते.

त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे पैसे सतत गुंतवत राहावे लागतील व ते दीर्घकाळ गुंतवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या पैशावर चक्रवाढ फार्मूला काम करताना दिसेल व तुमचे वेगाने पैसे वाढवण्यास मदत करेल.

तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल व जितके जास्त वेळ गुंतवणूक कराल तितके तुमचे पैसे चक्रवाढीच्या मदतीने वाढतील.

4- योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायचे ठरवाल तेव्हा दोन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या. यातील पहिली म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा पर्यायांमध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करावा. तसेच पैसे गुंतवताना जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुमचा कष्टाचा पैसा वाया जाणार नाही. समजा तुम्ही एफडी किंवा बॉण्ड्स किंवा छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवले तर यामध्ये जोखीम नसते.

परंतु मिळणारा परतावा मात्र कमी मिळतो. या उलट तुम्ही इक्विटी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. परंतु यामध्ये जोखीम देखील जास्त असते.

त्यामुळे तुम्हाला या दोन्हींमध्ये जर मधला मार्ग काढायचा असेल तर पैसे गुंतवताना ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच पैसे यामुळे गमावण्याची भीती राहत नाही व आपल्याला परतावा देखील चांगला मिळतो.

5- आपत्कालीन निधी तयार ठेवा जीवनामध्ये आपत्कालीन निधी खूप महत्त्वाचा असतो. कारण या निधीच्या मदतीने अडचणीच्या वेळीच मदत होते असे नाही तर तुमच्या दीर्घकालीन बचतीवर देखील त्याचा परिणाम होत नाही. या सवयी मध्ये तुम्ही कमीत कमी सहा महिन्यांच्या खर्चइतके पैसे बाजूला काढून ठेवणे गरजेचे असते.

जेणेकरून भविष्यात तुमची नोकरी गेली किंवा व्यवसायात काही नुकसान झाले तरी तुम्ही तुमचा दैनंदिन खर्च तुम्ही आरामात सांभाळू शकाल. समजा तुमच्याकडे जर आपत्कालीन निधी नसेल तर तुम्हाला तुमच्या बचतीतून पैसे काढावे लागतात व त्यामुळे तुमचा परतावा कमी होऊ शकतो. यामुळे आपत्कालीन निधी स्वतःकडे ठेवणे खूप गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News