शिक्षणाचा उपयोग शेतीत करून घेतो लाखोत उत्पन्न, वाचा श्रीकृष्णाची यशोगाथा

शिक्षण घेऊन त्यांनी पुण्यामध्ये नोकरीला सुरुवात देखील केली. नोकरी करत असताना कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केली व कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी थेट गाव गाठून शेती करायला सुरुवात केली व आज शेतीमध्ये देखील ते यशस्वी झालेले आहेत.

Ajay Patil
Updated:
capsicum chilli

उच्च शिक्षण घेऊन मोठ्या शहरामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवली की आपण आता जीवनामध्ये यशस्वी झालो असे साधारणपणे प्रत्येक तरुण समजत असतो व त्याच पद्धतीत संपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला जातो.

परंतु या उलट काही तरुण आपल्याला असे दिसून येतात की, यांनी उच्च शिक्षण घेतलेले असते व ते चांगल्या पद्धतीने एखाद्या ठिकाणी नोकरीला असतात व लाखोत  पॅकेज देखील मिळवतात.

परंतु कालांतराने अशा चौकटीमधील जीवन त्यांना आवडत नाही व ते वेगळे काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडतात व एखादा व्यवसाय सुरू करून त्यात यश संपादन करतात. अगदी असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देव धानोरा या गावचे युवा शेतकरी श्रीकृष्ण बोंदर पाटील याच्याशी घडला.

श्रीकृष्ण हे कॉमर्स शाखेमध्ये पदवीधर असून बिझनेस ॲनालिस्ट या विषयामध्ये त्यांनी एमबीए देखील पूर्ण केलेले आहे. एवढे शिक्षण घेऊन त्यांनी पुण्यामध्ये नोकरीला सुरुवात देखील केली. नोकरी करत असताना कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केली व कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये त्यांनी थेट गाव गाठून शेती करायला सुरुवात केली व आज शेतीमध्ये देखील ते यशस्वी झालेले आहेत.

 अशा पद्धतीने आहे श्रीकृष्ण बोंदर पाटील यांची शेती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देवधानोरा या गावचे श्रीकृष्ण चंद्रकांत बोंदर पाटील हा तरुण वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे व त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये एमबीए बिझनेस अनालिस्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.

अशा पद्धतीने शिक्षण असल्याने त्यांना पुण्यामध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी देखील मिळालेली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये देशामध्ये कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली व यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये  नोकरी सोडून श्रीकृष्ण यांना गावी परत यावे लागले.

गावी आल्यानंतर मात्र स्वस्थ न बसता श्रीकांत यांनी घरच्या चाळीस एकर शेतीमध्ये बदल करण्याचा ध्यासाने काम करायला सुरुवात केली व शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करावेत असा निश्चय करून त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली. अशाच प्रकारचे नवनवीन प्रयोग ते आज शेतीमध्ये करत असून त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळवत आहेत.

 शिमला मिरचीतुन घेतात भरघोस उत्पादन

श्रीकांत यांच्या नवनवीन पीक प्रयोग पाहिला तर यामध्ये जून महिन्यात त्यांनी सहा बाय दोन फूट अंतरावर बेळगाव पोपटी या शिमली मिरचीच्या 28 हजार रुपयांची लागवड केली व त्याचे योग्य व्यवस्थापन ठेवून या शिमला मिरचीची काढणी आता सुरू झाली आहे.

आत्ताच त्यांना या शिमला मिरचीचा पहिला तोडा मिळाला असून त्यामध्ये 800 किलोचे  उत्पादन त्यांना मिळाले व 32 रुपये दराने ही शिमला मिरची विकली गेली. पुढे कमीत कमी 20 ते 25 टन मालाचे उत्पादन त्यांना अपेक्षा असून त्यातून चांगला पैसा हाती अशा देखील विश्वास आहे.

 इतकेच नाही तर श्रीकृष्ण पाटील यांनी

तीन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रामध्ये तैवान पिंक या जातीच्या पेरूची लागवड केली व हा त्यांचा पहिलाच प्रयोग होता. परंतु नवनवीन प्रयोग आणि योग्य नियोजन यामुळे पेरू पासून देखील त्यांना चांगले उत्पादन आता मिळायला सुरुवात झालेली आहे.

पहिल्याच बहरामध्ये त्यांना पेरूचे 16 टन उत्पादन मिळाले व त्या पेरूला किमान 40 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत व सरासरी 60 रुपये किलोचा दर मिळाला.

तसेच या पिकांसोबत त्यांनी दोन एकरावर टरबुजाची लागवड केलेली होती व टरबुजाच्या बाहुबली या वाणापासून त्यांनी 45 टन पेरूचे उत्पादन घेतले.

रमजान महिन्याचा कालावधीच्या दृष्टिकोनातून त्यांनी या सगळ्या टरबूज पिकाचे नियोजन केले व  त्यांच्या या टरबूजाला 11 रुपये सरासरी किलोला दर मिळाला व सव्वा लाखाचा खर्च वजा करतात चांगला पैसा त्यांना मिळाला.

 टोमॅटोचा प्रयोग देखील केला यशस्वी

या सगळ्या पिकांसोबत भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय घेतला व दोन एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो लागवड केली व टोमॅटो पासून देखील त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला.

त्यांनी पिकवलेल्या टोमॅटोचे साडेतीनशे कॅरेट दीड हजार रुपये दराने विक्री झाले तर बाकीचे दीड हजार कॅरेट सरासरी साडेपाचशे रुपये दराने विक्री झाली. टोमॅटो मध्ये बाजार भावात थोडा फटका त्यांना बसला. यांच्या मते जर टोमॅटोला बाजारभावाची साथ चांगली राहिली असती तर टोमॅटो पासून चांगले उत्पन्न हाती मिळाले असते.

 शिक्षणाचा उपयोग शेतीत ठरला फायद्याचा

त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले असल्यामुळे ते व्यवस्थापन या विषयांमध्ये पदवीधर आहेत. कोणताही उद्योग व्यवसाय नव्या वळणावर नेऊन त्याला विकसित करण्याच्या संदर्भातील त्यांचे शिक्षण असल्याने त्यांनी या शिक्षणाचा उपयोग शेतीत केला व ते शेतामध्ये देखील या माध्यमातून यश त्यांनी मिळवलेले आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड करून त्यापासून यशस्वीपणे उत्पादन मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe